ईतर

दीपपूजा,जांभळ,दर्श सोमवती अमावश्या निमित्त माहूर गडावरील कैलासाचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचे माहेरघर असणाऱ्या माहूर गडाची साधू-संताची भुमी म्हणून ओळख आहे अनेक प्राचीन मंदिरे या ठिकाणी आहेत आज सोमवार दि.१७ जुलै२०२३ दीपपूजा, जांभळ,दर्श, सोमवती अमावस्या निमित्त लाखो भाविकांनी कैलास टेकडी येथील कैलासाचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात एकच गर्दी

केली होती अनेक वेळा ट्राफिक सुद्धा जाम झाली होती अनेक भक्तांनी रस्ता मोकळा करून देण्यासाठी मदत केली. तेलंगणा, आंध्रप्रदेशसहयवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी,अमरावती यासह अनेक जिल्ह्यातील भावीक निसर्गाच्या सानिध्यात घनदाट जंगलात असलेल्या कैलास टेकडी या ठिकाणी अमावस्याला

दर्शनासाठी येत असतात यावेळी अनेक भाविक भक्त गडावरील दत्त शिखर येथील दत्तात्रयाच आई रेणुका, अनुसया मातेच दर्शन सुद्धा घेतात भक्ताकडूनच भाविकांना अनेक ठिकाणी अल्पोपार पाण्याची व्यवस्था केली जाते अनेक भक्ताची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते अशी अख्यायिका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close