ईतर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त पुसद येथे शिवसामान्यज्ञान परीक्षेचे दोन फेब्रुवारी रोजी आयोजन!

पुसदः हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद द्वारा आयोजित आणि भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था पुसद द्वारा प्रायोजित शिवसामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दोन गटात परीक्षा संपन्न होणार आहे. इयत्ता आठवी ते बारावीचा अ गट असून सकाळी ९ ते १० वाजता पेपर असणार आहे.तर इयत्ता चवथी ते सातवीचा ब गट असून सकाळी १० ते ११ वाजता परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.परीक्षेची नावनोंदणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शाळेत दि.२३ जानेवारी पूर्वी करावी. नाव नोंदणी केल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षा नि:शुल्क असणार आहे.प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत प्रथम क्रमांक रू ५००१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रू३१००  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रू २००१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असूनया शिवाय प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना समितीकडून परीक्षा क्रमांक देण्यात येणार आहे त्यामुळे शाळेमध्ये नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.यावर्षी प्रथमच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा निहाय प्रत्येक गटात समितीकडून तीन बक्षिसे दिल्या जाणार आहेत.पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या शाळांना सहभागी व्हायचे आहे त्यांना समितीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयोजन करता येईल. त्या शाळेच्या शिक्षक, मुख्याध्यापकांना त्यांचे स्तरावर आयोजन करायचे असल्यास त्यांनी समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे ९४२३१२१६६२ यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे.छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्य किरण बाळासाहेब देशमुख, शशिकांत जामगडे, यशवंत देशमुख, मुख्याध्यापक किरण देशमुख, रवींद्र घड्याळे, उमेश इंगळे ,नागेश जोगदे, गजानन इंगोले, चंद्रशेखर देशमुख, अमोल शिंदे, अजय क्षीरसागर, अमोल व्हडगिरे यांच्या प्रयत्नातून परीक्षेचे नियोजन सुरू आहे.परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित पन्नास प्रश्न असून मराठी व इंग्रजी माध्यमात परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळाच परीक्षा केंद्र असणार आहे.पुसद अर्बन बँक आणि भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, छञपती शिवराय जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते यशस्वीतेसाठी प्रयत्न करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close