राजकिय

राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’१ सप्टेंबर रोजी पुसद शहरात धडकणार; या जनसन्मान यात्रेला राज्यात विविध घडलेल्या घटनांना समोर जावे लागणार!

पुसद : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.सारं काही आलबेल आहे असं वाटत असताना २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आणखी एका ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत भाजप तसेच महायुतीतील अनेक दिग्गजांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभूत केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सध्याच्या राजकारणाची बदलती दिशा पाहता आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुती सरकारमधील काही मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत.महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीन मुख्य पक्ष असले तरी शिंदे गट आणि पवार गटात अजिबात मेळ नाही. उलट उभयता परस्परांवर कुरघोडी सुरू आहे.लाडकी बहीण योजनेचे सारे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत असल्याने अजित पवार अस्वस्थ झाले होते त्यामुळे अजित पवार या योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने फक्त माझी लाडकी बहीण योजनेचा फलक लावून जनसन्मान यात्रेच्या प्रचार करण्यात येत आहे तर मुख्यमंत्री हा शब्द फलकावरुन गायब केला आहे यावरून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून सध्या लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फटाक बसला होता. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा फटका बसू नये म्हणून अजित पवार यांनी कदाचित हाच धागा पकडून त्यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा सुरू केली असून ही जनसन्मान यात्रा १ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद मतदारसंघात येणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी शासकीय विश्राम गृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे दिली.राज्य सरकारने विविध योजनेच्या माध्यमातून विकास पर्व सुरू केले आहे. त्यामध्ये लाडकी बहिण योजने मुळे महिला वर्गात आर्थिक आधाराला घेवून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या पार्शवभूमीवर अजित दादा मतदार संघातील जनतेशी संवाद साधणार आहे.येत्या रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी पुसद येथील यूपी चाटच्या बाजूला पारध मैदानात ही सभा संपन्न होणार असल्याची महिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे.त्यावेळी पुसद विधानसभेतील झालेल्या विकासकामाचा लेखाजोखा मांडला ह्या पत्रकार परिषदेला आमदार इंद्रनील नाईक, क्रांती उर्फ बाळासाहेब कामरकर पाटील, भगवान अशोले, इरफान भाई, कयुम भाई, प्रा संजय चव्हाण, प्रा. नरेन्द्र जाधव,ॲड. सुनील ढाले, ऋषिकेश पंडितकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा सध्या राज्यात घडलेल्या विविध घटनां बाबत या जनसन्मान यात्रेला  समोर जावे लागणार असल्याचे चित्र आहे.

पुसद मतदारसंघात या जनसन्मान यात्रेला मराठा आरक्षणा’ च्या मुद्दा तसेच महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजही नाराज असुन एकीकडे बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एक घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दोन चिमुरड्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मालवणमधील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने या घटनेवरुन राज्यात खूप राजकारण सुरू असून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे तर शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण  आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यावर अजित पवार यांनी सुरवातीलाच संपूर्ण महाराष्ट्राची माफीही मागितली आहे.मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार असे अजित पवार म्हणाले तरीही या सर्व घटनेला या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close