एकाच शेतकऱ्याची दुसऱ्यांदा गेली नाल्यावरील मोटार चोरी ! काऊरवाडी शेत शिवारातील घटना!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):-महागाव तालुक्यातील हिवरा संगम शेतकरी अजय ज्ञानबाराव कदम यांच शेत सर्वे १६/२ काऊरवाडी शिवारात शेती असून शेता जवळील नाल्यातून त्यांचीच पाणबुडी मोटर चोरीला गेल्याची घटना घडली असून त्यांनी या संबंधित फिर्याद महागाव पोलीस स्टेशन येथे दिली आहे.हिवरा येथील शेतकरी अजय कदम यांच्या शेतात असलेली ५ एचपी ची मोटर चोरी गेल्याची घटना या शेतकर्यां सोबत दुसऱ्यांदा घडली आहे ,सदर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आत्ताच कापसाची लागवड केली असून त्यासाठी त्याने शेता जवळील नाल्यावर आपल्या नियमित मोटर पंपातून पाणी येईल या उद्देशाने कापसाचे लागवड केली होती , पण सकाळी सात वाजता शेतात गेले असता त्याला आपली नाल्यात असलेली मोटर चोरी गेल्याची दिसून आले त्यावरून त्याने महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून , या घटनेमुळे परेशान झालेला शेतकरी नुकतेच निघालेले पीक वाळताना पाहून हतबल झाला आहे ,यापूर्वीही या शेतकऱ्याच्या रुपये २५ हजाराची मोटर चोरीला गेली होती परंतु त्या मोटर खरेदीचे बिल सदर शेतकऱ्याकडून हरविले गेल्यामुळे त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला देता आली नाही , आज चोरीला गेले याची गेलेल्या मोटरची किंमत दहा हजार रुपये असून संबंधित मोटरीचे आज रीतसर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली गेली या चोरीचा चोर त्वरित जेर बंद करावा अशी हिवरा शेत शिवारातून संबंध शेतकऱ्याची मागणी होत आहे या आधी सुद्धा त्यांच्या शेतातील लोखंडी अँगल तसेच फवारणीसाठी विकत घेतलेली नवीन टाकी सुद्धा अज्ञात व्यक्तींनी फोडली असून सदर शेतकऱ्यांना जाणून-बुजून कोणीतरी त्रास देत असल्याचे बोलल्या जात असून याकडे महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी योग्य तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा व मला न्याय मिळवून देण्याची मागणी अल्पभूधारक शेतकरी अजय कदमसह त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.



