ईतर

हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिताच्या कुटुंबास ५ लाखाची मदत; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश 

महविकास आघाडी सरकारची फक्त घोषणाबाजी-चित्राताई वाघ

मुंबई (वृत्तसेवा):संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिता पिसुड्डेच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. देवगिरी येथे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आमदार समीर कुणावार, आशीष देशमुख यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ. पिसुड्डे यांनी धनादेश स्वीकारला. यावेळी अंकिताचा भाऊ व कुटुंबीय उपस्थित होते.३फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने निर्भयाचा मृत्यू झाला होता. ही घटना वर्धा निर्भया प्रकरण किंवा हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश निर्माण झाला होता संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांनाही या सरकारला या आश्वासनचा विसर पडला होता.मात्र महायुतीचे सरकार येताच महायुतीच्या सरकारकडून पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न केला गेला या पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले आणि २५ सप्टेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली. महाविकास आघाडीच्या काळात घडलेल्या घटनेबाबत जरी तत्कालीन सरकारला विसर पडला असला तरी महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील जनतेबाबत किती सवेंदनशील आहे याची प्रचिती या घटनेवरून दिसून येत असून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही. अडीच वर्ष पीडित कुटुंबाला कसलीही मदत केली नाही.निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला असून म्हणूनच आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे. असे चित्राताई वाघ म्हणाल्या..निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close