शाळेच्या एसटी बस वेळेवर सुरू करा – मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर एसटी बस उपलब्ध नसल्याने येथील सर्व विद्यार्थ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची भेट घेऊन या मार्गावरील बस शाळेच्या वेळेवर निश्चित करुन द्यावी, अशी मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांसमवेत वणी येथील एस.टी. महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस फेरी चालू करुन द्यावी अशी मागणी केली.
मनसेच्या मागणीनुसार येत्या सोमवार पासून हया बस फेऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेवर होईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकानी दिले. आगार प्रमुखांनी दिलेल्या शब्दामुळे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मनसे व फाल्गुन गोहोकार यांचे आभार मानले. यावेळी मनसेचे हरीश कामारकर, वेणू येणंपोतूलवार, राहुल पचारे, मनोज बगवा, गौरव वालकोंडावर, कु.स्नेहल काकडे, कु.रोहिणी काळे, कु. ट्विंकल उपरे, शिवम बोथाले, विनीत बलकी यांच्या सह महाराष्ट्र सैनिक व या भागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.