ईतर

धारधार शस्त्रासह एकास अटक;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

पुसद : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.२४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुसदचे पथक पोलीस उपविभागात गस्तीवर असतांना मौजा बोरनगर येथील इसम नामे अतुल देवराव राठोड हा त्याचे घरात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या दृष्टीने किंवा गुन्हा करण्याचे इरादयाने धारधार तलवार बाळगून असल्याची मुखबीराव्दारे गोपनीय माहिती मिळाली असता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष संशयितांची घराची झडती घेतली असता त्याचे घरातून एक धारधार तलवारी सारखी मुठ असलेले शस्त्र जप्त करून आरोपी नामे- अतुल देवराव राठोड वय २२ वर्षे, रा.बोरनगर तांडा ता. पुसद जि. यवतमाळ याला ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, अमोल सांगळे, पोलीस अंमलदार तेजाब रंणखांब, सुभाष जाधव, पंकज पातुरकर, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, दिंगबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close