राजकिय

अखेर दाहवर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुसदला मंत्रीपद आमदार ॲड.इंद्रनील नाईक यांनी घेतली शपथ!

महायुतीच्या प्रत्येक सहकारी - पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व नाईक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण 

पुसद: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बंजाराबहुल असलेल्या या पुसद मतदारसंघात येथील नाईक घराणे वलयांकित आहे. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक या दोन मुख्यमंत्र्यांनी हरित क्रांती व जलक्रांतीतून महाराष्ट्राला दिशा दिली.१९५२ पासून पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक घराण्याने विजयाची परंपरा कायम राखली आहे २०२४ विधानसभा निवडणुकीत यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे कनिष्ठ सुपुत्र विद्यमान आमदार इंद्रनील नाईक बदललेल्या राजकीय परिस्थितीत महायुतीकडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूकीला समोर जाऊन घवघवीत यश संपादन केले आहे त्यामुळे नाईक घराण्यांना अखेर १० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यमंत्रीपद मिळाले असून नुकत्याच नागपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात ॲड.इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुसद मतदार संघातील महायुतीच्या प्रत्येक सहकारी – पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व नाईक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील अनेक बड्या राजकीय घराण्यांपैकी विदर्भातील पुसदचे नाईक घराणे एक आहे. या घराण्यातील वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून वसंतरावजी नाईक यांची ओळख होती. त्यामुळेच चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यावर त्यांचा वारसदार म्हणून वसंतरावजी नाईक यांची निवड केली होती. राज्यातील कृषिक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जातात. चव्हाण ते नाईक हे सत्ताहस्तांतरण पुन्हा ९१ च्या दशकात घडले. त्यावेळी चव्हाण यांचे मानस पुत्र शरद पवार मुख्यमंत्रिपदी होते व तर वसंतरावजी नाईकांची जागा त्यांच्याच घराण्यातील दुसरी पिढी सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती. शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपवली होती. १९९१ – १९९३ असे तीन वर्षे नाईक मुख्यमंत्री होते. मधल्या काळात नाईक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले. पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, नाईक घराण्याने पवार यांची साथ दिली. राज्यात आघाडीची सत्ता आल्यावर नाईक घराण्यातील मनोहरराव नाईक एका दशकाहून अधिक काळ मंत्री होते.जेष्ठ नेते मनोहरराव नाईक यांनी कॅबिनेट मंत्री, अविनाश वसंतराव नाईक (विधानपरिषद सदस्य) यांनी राज्यमंत्री होते.ॲड.निलय नाईक यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून नाईक परिवाराचे आमदार होते.२०१९ च्या निवडणुकीत या घराण्यातील नवी पिढी इंद्रनील नाईक यांच्या रुपात राजकारणात आली.२०१९ साली भाजपने ॲड.निलय नाईक यांना तिकीट दिल्याने नाईक घराण्यांतच तिढा निर्माण झाला होता परंतु या निवडणुकीत ॲड इंद्रनील नाईक हे ९ हजार मतांनी विजयी झाले होते तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ॲड.इंद्रनील नाईक यांनी विक्रमी ९० हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ते पुसद मतदारसंघातून भरघोस मताने विजयी झाले.२०१९ ते २०२२ या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण त्यात राष्ट्रवादीकडून इंद्रनील यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यांनीही त्यांना मंत्री केले नाही. २०२४ मध्ये ते पुन्हा पुसदमधून विजयी झाले. यावेळी त्यांना मंत्रिपदाची आस आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना ही संधी मिळू शकते, असे नाईक यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तसे झाल्यास पाच वर्षांपासून खंडित झालेली नाईक घराण्याची मंत्रिपदाची परंपरा अखेर १० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बंजारा बहुल असलेल्या या मतदारसंघात आमदारला राज्यमंत्रीपद मिळाले असून नुकत्याच नागपूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार ॲड.इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली असून मतदार संघातील महायुतीच्या प्रत्येक सहकारी – पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व नाईक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close