ईतर

“भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ वाचन वर्षावास आयोजन

पुसद: शहरांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन संभाजीनगर पुसद येथे वर्षावास निमित्य ग्रंथ वाचनास दि.०३ जुलै २०२३ रोजी रोज सायंकाळी ०८ ते ०९ या वेळामध्ये लुंबीनी बुद्ध विहार संभाजी नगर पुसद येथे वर्षावासा निमीत्त “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या आधुनिक तर्कशिल ग्रंथाचे वाचन भदन्त कमल धम्मो हे आपल्या बौद्धिक तर्कशुद्ध वानीने वाचन करणार आहेत.”बुद्ध म्हणजे उजेडापुढचा उजेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानापुढले ज्ञान! बुद्धानं उजेडाला उन्नयनशील तर्कशास्त्र शिकविले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला कोणतीही अंतिम सीमा नसलेले ज्ञान शिकविले.”भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” संपूर्ण मानवजातीला अंधारा मधुन प्रकाशा कडे नेणारा जागतिक ग्रंथ आहे या जागतिक आधुनिक ग्रंथा मधुन समता बंधुता व ऐकते चे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आणि या ग्रंथाच्या तीन महिन्याच्या वर्षवासाचे आयोजन लुंबीनी महिला मंडळ व जागो भिम सैनिक युवा तरुण मंडळाचे अध्यक्ष गजानन धाबे यांनी केलेले आहे. तरी “बुद्ध आणि धम्म” या ग्रंथाच्या वाचनाला आत्मसात करून आचरणात आणण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान भदन्त कमल धम्मो लूंबीनी बुद्ध विहार पुसद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close