लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती समारोह मान्यवरांची आदरांजली

पुसद : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संकुलाचे आधारवड , यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांचा ३९ वा स्मृतीदिन समारोह श्री शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला . या प्रसंगी सर्वप्रथम माजी आमदार निलय नाईक , डॉ. उत्तमराव रूद्रवार , माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर , रामभाऊ देवसरकर, अविनाश देशमुख , सुभाषराव देशमुख , डॉ. विजयराव माने , डॉ. साहेबराव चौधरी यांनी दिपप्रज्वलन व पूजन करून आदरांजली अर्पण केली.
यांच्या समवेत सुधाकरराव ठाकरे , निळकंठ पाटील , शिवराज ठाकरे , सिराज हिराणी , विजय जाधव , महेश खडसे , अनिरुध्द पाटील चोंढीकर , डॉ. शैलेन्द्र नवथळे , डॉ. स्वप्नील देशमुख यांनी आपली आदरांजली अर्पण केली . यासोबतच योगाजी गवळी , श्रीराम पवार , ॲड . रमेश पाटील , दिलीपराव पारध , रमेश पाटील चौधरी , बाबारावजी भेंडे , डॉ. गोविंदराव फुके , जे . डी. ढवळे , प्रा. फुके , बी.जी. राठोड , भगवानराव आसोले , उमाकांत चौधरी, संभाजी टेटर , निखील चिद्दरवार , सुधीर देशमुख , डॉ. पंकज जयस्वाल , अश्विनी अनिरुध्द पाटील चोंढीकर , सुनिता ठाकरे , माया राऊत , विद्या पाटील , साहेबराव धबाले , रणजीत आसोले , बालाजी वानखेडे , विवेक मस्के , आशिष देशमुख , नंदुभाऊ काळे , पंडीत घाडगे , मनसुर खाण , जामगडे सर , महेश धुमाळ , अजगर शेख , बाळाभाऊ चौधरी , दिनेश हांडे , सचिन सरगर , नितिन पाटील , रंगराव राऊत , अमोल ठाकरे , रामेश्वर चौधरी , देविदास जाधव , शिवाजी जाधव , किरण देशमुख , विकास पाटील , शिवशंकर चौधरी , किशोर काळे , गजानन ठाकरे यांनी आपली आदरांजली अर्पण केली.
त्याचबरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक नामदेवराव फाटे , डी.पी. देशमुख , सुधाकर लकडे , सदाशिव पठाडे , आर. एफ. शेख , पी.के. सावदे , सुखदेवराव भगत , पंचमसिंह चव्हाण , शामराव राऊत , पंजाबराव सुरोशे , प्रा. गणेशराव रावते , दिपक महल्ले , प्रा. विलास चव्हाण , माधवराव कदम , सुधाकर वानखेडे , अरुण ठाकरे , गावंडे सर , विजय उंचेकर , दिपक धुमाळ , के. बी. राठोड , केशव चेटुले , व्ही . ए . राऊत , राजेंद्र रोकडे , शेख बीजान सोबतच पत्रकार अनिल चेंडकाळे ,
प्रा. प्रकाश लामणे , रवी देशपांडे त्याचबरोबर संस्थेच्या सर्व शाखेचे विद्यमान प्राचार्य रामचंद्र हिरवे , डॉ. लक्ष्मण वानखेडे , अमीत ठाकुर , पंडीतराव मस्के , कैलास ठेंगे ,वसंतराव धनवे , विष्णू सादुडे , संजय निकम , अवधुतराव देवसरकर , नारायण धबडगे , उपप्राचार्य दत्तात्रय जीवने , एन.पी. देशमुख त्याचबरोबर श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , श्री शिवाजी अध्यापक विद्यालय , गुरुकुल इंग्लिश स्कूलव संस्थेच्या सर्व शाखेचे पर्यवेक्षक , प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , एन.सी.सी. कॅडेट्स व पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंढीकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली . बहारदार संगीताच्या साथीने सारंग कोरटकर , नारायण हणवते , महेन्द्र अंबुरे व विद्यार्थिनी संच यांनी वैविध्यपूर्ण गितातून आदरांजली अर्पण केली . स्मृती समारोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . गणेशराव रावते व प्रा. गजानन जाधव यांनी केले .



