पुसद अर्बन बँकेच्या संचालक मंडळाकडून माजी मंत्री मनोहर नाईकांचे ऋणनिर्देश

पुसद :संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन कॉ ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक सलग तिसऱ्यांदा अविरोध झाली. तर बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांची देखील सलग पाचव्यांदा अविरोध अध्यक्षपदी निवड झाली.शरद मैंद यांच्या मागील २१वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या प्रदीर्घ प्रवासात पुसद चे जेष्ठ राजकीय व्यक्तिमत्व माजी मंत्री मनोहरराव नाईक त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहिले. त्याबद्दल काल शरद मैंद यांनी बँकेच्या सर्व संचालकांना सोबत घेत मनोहरराव नाईक यांचे आशीर्वाद घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी सुधीर अमृतराव देशमुख (दिग्रस )शरद शेषराव पाटील यांचे सह जेष्ठ संचालक के.आय.मिर्झा,ललित सेता,नीळकंठ पाटील,क्रांती पाटील (कामारकर),विनायक डुब्बेवार,प्रवीर व्यवहारे,गोपाल अग्रवाल(उमरखेड ), बंटी (सुनील )चव्हाण,रंजीत सांबरे उपस्थित होते.तसेच पुसद च्या सहकार, शिक्षण व नप क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमाटवणारे माजी मंत्री व पणन महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ एन. पी.हिराणी, माजी आमदार तथा मराठा समाज भूषण विजय पाटील चोंढीकर,जेष्ठ नेते के. डी. जाधव सर, सहकार क्षेत्रातील दिग्गज जेष्ठ नेते विजयराव चव्हाण यांचे देखील आशिर्वाद घेतले. बँकेचे माजी अध्यक्ष अप्पाराव मैंद यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात बँकेचा नावलौकिक होत असून सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कार्य सुरु असल्याबद्धल सर्व जेष्ठ नेत्यांनी समाधान व्यक्त केले.



