ईतर

‘ जय गुरुदेव ‘ च्या गजराने पुसद नगरी दुमदुमली ; राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखीचे जल्लोषात स्वागत!

शेकडो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ...

पुसद : मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका पालखीचे बुधवारी पुष्पावंती नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गुरुदेव अनुयायानी दिलेल्या ‘ जय गुरुदेव ‘, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय ‘ आदी गगनभेदी घोषणांनी पुसद नगरी दुमदुमून गेली.

याप्रसंगी शहरासह तालुक्यातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी करीत चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची चरण पादुका पालखी आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला जात असते. त्यानिमित्त स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने येथील देशमुखनगरमधील मंडळाच्या कार्यालयात या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे व महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे यांच्या हस्ते चरण पादुका पालखीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. त्यानंतर महाआरती घेऊन पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पुसद शहर व तालुक्यातील राष्ट्रसंतांच्या शेकडो भाविकांनी मोठी गर्दी करून चरण पादुकांच्या दर्शनासह प्रसाद व फराळाचा लाभ घेतला. या पालखी सोहळ्यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मोहिनीताई नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, ठाणेदार सेवानंद वानखेडे आदींनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुरुकुंज येथील पालखी प्रमुख हभप सुशील वणवे महाराज यांनी पालखीचे महत्त्व पटवून देत राष्ट्रसंतांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी गुरुकुंजाहून पालखी समवेत आलेल्या १२ गुरुदेव अनुयायांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रा. नंदकुमार खैरे लिखित ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ‘ ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे पदाधिकारी शरद राऊत यांनी केले. संचालन तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे यांनी तर आभार कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, उपाध्यक्षद्वय नंदकुमार पंडित व मनोहर बनस्कर, कोषाध्यक्ष सुरेश कदम, सहकोशाध्यक्ष माधव जाधव, मध्यवर्ती प्रतिनिधी यशवंत देशमुख, ज्ञानेश्वर सुरडकर, रमेश सरागे, शरद राऊत, अनिल अस्वार, राजेंद्र काळबांडे, शिवशंकर नागरे, किसन गरडे, शिवलिंग पटवे, गणेश धर्माळे, शंकर सोळंके, पुंडलिक भालेराव, यशवंत भगत, अशोक भगत, ज्ञानेश्वर इंगोले, निवृत्तीनाथ बैस्कार, दिवाकर मोरे, प्राचार्य हेमंत महल्ले, ज्ञानेश्वर ताकतोडे, बाबासाहेब वाघमारे, नरेंद्र खैरे, भाऊ देशमाने, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, मंगला पंडीत, माया काळबांडे, वैष्णवी लामणे, इंदू राऊत, संध्या पवार, जया मोरे, शीला जाधव, माधुरी वांझाळ, पुष्पा खैरे, ताई इंगोले, विमल वाघमारे, उषा पखाले, मंदा पाचकोरे, कल्याणी पाटील, आदींनी पुढाकार घेतला.यावेळी पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेव प्रेमी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close