जेष्ठ नागरिकांना सन्मान देणे व त्यांचा आशिर्वाद घेणे हे तरुण वर्गाचे आद्य कर्तव्य आहे.- व्ही. बी. कुळकर्णी, जिल्हा न्यायाधिश, पुसद

पुसद: येथे दि. १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी तालुका विधी सेवा समिती, पुसद तथा वकील संघ, पुसद यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरीक व त्यांचे अधिकार व कायदे या विषयांवर ज्ञानदान कार्यक्रमाचे आयोजन पुसद न्यायालयातील कॅन्टीन हॉलमध्ये दुपारी २.१० मिनीटाने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास पुसद येथील सर्व न्यायाधिशांनी आपली उपस्थीती नोंदविली तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे माजी अध्यक्ष व सध्याचे सदस्य श्री. आशिष देशमुख, तसेच पुसद वकील संघाचे अध्यक्ष श्री. खराटे हे या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. सदर कार्यक्रमास पुसद येथील श्री. व्ही. बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश क्र. १. पुसद श्रीमती एन.एच. मखरे मॅडम, जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री. एन. जी. व्यास साहेब, श्री. डी. जी. म्हस्के साहेब, श्री. वाघमोडे साहेब, श्रीमती एस. जी. जाधव मॅडम, श्री. जी. एस. वर्षे साहेब, श्री. व्हि. बी. चव्हाण साहेब, श्री. झेड. झेड. कादरी साहेब यांची उपस्थिती होती. तसेच वकीलमंडळी अॅड. ममता सगणे, अॅड. जयश्री देशमुख, अॅड. सुशिला नरवाडे, अॅड. चेता पांढरीपांडे, अॅड. सुचिता नरवाडे यांनी आपली उपस्थिती नोंदविली होती.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन अॅड. ममता सगणे यांनी पार पाडले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. सविता आढाव यांनी सुरेख पध्दतीने पार पाडले. सदरहू कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. श्री. एन. जी. व्यास साहेब यांनी Rights of Senior Citizen या विषयावर केले. कायद्यामध्ये जेष्ठ नागरिकांना कोणती मदत मिळू शकते व कायदे कोणते आहेत हे सांगीतले. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक मा. श्री. जी. एस. वर्षे साहेब यांनी Rights of Senior Citizen या विषयावर उपस्थितांना समजेल अशा साधा व सोप्या भाषेमध्ये उदाहरणासह मार्गदर्शन केले त्यांनी जेष्ठ नागरिकांचे काय अधिकार आहेत व त्यांच्यासाठी शासनाने कोणत्या विविध योजना आखल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली.त्यानंतर अध्यक्षीय भाषण कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. व्ही. बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश क्र. १ यांनी केले. त्यांनी जेष्ठ नागरिक यांच्यासाठीचे कायदे व समस्या या विषयावर सविस्तर बोलताना असे म्हटले की, ‘जेष्ठ नागरिक यांच्या अधिकाराचे जेष्ठ नागरिकांना माहिती देणे व त्यांचा सतत सन्मान करणे ही आजच्या काळाची गरज आहे. घरातील वयोवृध्द माणुस भिष्माचार्यासारखा अनुभवी असतो म्हणून त्यांच्या अनुभवातून आपल्याला फार मोठे शिक्षण मिळत असते. त्यांनी पुढे असेही म्हटले की, जेष्ठ नागरिकांना सन्मान देणे व त्यांचा आशिर्वाद घेणे हे तरूण वर्गाचे आद्य कर्तव्य आहे. जेष्ठांचा आशिवार्दाशिवाय प्रगती होवू शकत नाही. आपण आपल्या संस्कृतीमध्ये प्रभात काळी आपल्या आईवडीलांना नमस्कार केल्यास आपल्या जिवनामध्ये अमूलार्ग बदल होईल आपण रोज प्रतःस्मरण “करागृह वसते, लक्ष्मी करमध्ये सरस्वती व करमूल्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतनस्तनम मंडले विष्णूपत्नी नमस्तुध्यम पादस्पर्शम क्षमस्वमे” असे म्हणून आपल्या मातृभुमीला नमस्कार करावा व नंतर घरातील सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार करावा असे प्रतिपादन केले. त्यांनी भाषणाची सुरुवात एका कवितेनी केली व असे म्हटले की, “घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी” या कवितेने केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, घर कितीही सुंदर बांधले व त्याच्या भिंती कितीही सुंदर रंगाने व नक्षीकामाने सजलेल्या असल्या पण त्या घरामध्ये घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान होत नसेल तर त्या घराला काहीच महत्व उरणार नाही व त्याला घर देखील म्हणता येणार नाही. आपल्या देशामध्ये मातृभुमी व देवानंतर आपले आजी आजोबा, आईवडील, मोठे भाऊ बहीण यांचेच आपण आशिर्वाद घेत असतो व ती आपली पुरातन संस्कृती आहेत. हे गुण आपल्या रक्तातच आहेत. विदेशामध्ये जसे मदर्स डे, फादर्स डे साजरे कले जातात तसे आपल्या देशात पुर्वी कधीही साजरे केले जात नव्हते कारण आपल्या मातापित्यांची व जेष्ठांची रोजच आशिर्वाद घेत होतो व आपली ही परंपरा होती. परंतू अलिकडच्या काळात आपले हे संस्कार विस्मृत झाल्यासारखे दिसत आहेत. ज्या जेष्ठांनी आपलेसाठी आयुष्यभर खस्ता खावून ओढग्रस्तीने संसार करत स्वतःच्या मुलाबाळांना वाढविले व त्यांना मोठे करून त्यांच्या पायावर उभे केले व त्याच मुलांनी त्यांचे आईवडीलांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखविला असे दृश्य समाजात ब-याच ठिकाणी दिसून येते. समाजात असेही दृश्य दिसते की, स्वतःच्या मुलांच्या जबाबदा-या आपल्या आईवडीलांवर मुले व सुना टाकुन देतात. वृदधांना आरामाची गरज असते. अशाचप्रकारे आज आपल्या सगळ्यांना आपल्या संस्काराची जे विस्मरण झाले आहे ते स्वत:चे आत्मस्वरूप पाहून दुर करणे आजची आवश्यक गरज आहे. जो जेष्ठ नागरिकांचा सन्मान आहे तो आपल्याला करावाच लागेल असे आवर्जून सांगीतले. त्यांनी आपल्या भाषणात आपण आपली संस्कृती व स्वतत्व हरवून बसलो तर जे जग आपल्याकडे आशेने व आदराने पाहत आहे आणि आपल्याकडून काही शिकावयास मिळेल असा विचार करत आहे त्यांची निराशा होईल. करीता त्यांनी वृध्दांच्या व जेष्ठ नागरिकांच्या संबंधातून सातत्याने कार्यक्रम व्हावेत व त्यांना कोणताही त्रास होवू नयेत यासाठी प्रयत्नशिल राहावे असा संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पुसद न्यायालयाचे अधिक्षक श्री. विलास बंगाले, श्री. भोयर, श्री. कोयरे, श्री. पाथरकर, श्री. ठाकरे, कु. बेले, श्री. कांबळे, श्री. जोशी, पोलीस कर्मचारी, जेष्ठ नागरिक, वकिल मंडळी मोठ्या संख्येने हजर झाले होते.



