ईतर

पर्यावरणाचा -हास होउ नये यासाठी सर्वानींच काळजी घेणे गरजेचे- वसंत बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश पुसद,

पुसद: यवतमाळ जिल्हा विधि सेवा समिती व तालुका विधी सेवा समिती पुसद तसेच पुसद वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ जुन २०२३ रोजी दुपारी २:०५ वाजता पुसद न्यायमंदीर येथील कोर्ट कॅन्टींग हॉल येथे “जागतीक पर्यावरण दिवस व तसेच लहान मुलांचे अधिकार ” या विषयांवर ज्ञानदान कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्याप्रसंगी पुसद येथील जिल्हा न्यायाधिश कं . १ वसंत बी. कुळकर्णी साहेब, हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायाधीश क. स्तर साहेब,एन.जी. व्यास साहेब, सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, पुसद डी. जी. मस्के साहेब, २ रे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, व्ही. एस. वाघमोडे साहेब, ३ रे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, जी. एस. वर्षे साहेब, ५वे सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर, झेड. झेड. कादरी साहेब, ७ वे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर तसेच पुसद वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजी खराटे, हे मंचावर आवर्जुन उपस्थित झाले होते.सदर कार्यक्रमाचे प्रथम मार्गदर्शक वक्ते म्हणुन सर्वप्रथम गोविंद वर्षे साहेब, ५वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद यांनी जागतीक पर्यावरण दिवस म्हणजे काय हे सांगतांनी त्यांनी कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण असे सांगितले. त्यांनी पर्यावरणाचा झपाटयाने कसा -हास होत आहे यावर प्रकाशझोत टाकला व – हास होत असल्याबदल चिंताही व्यक्त केली व मनुष्याला पर्यावरणाची काळजी घेण्याचे गरज असल्याचे म्हटले. त्यानंतर ज्ञानदान कार्यक्रमाचे दुसरे वक्ते म्हणुन व्ही. एस. वाघमोडे साहेब ३रे सह दिवाणी न्यायधिश क. स्तर, पुसद यांनी लहान मुलांचे अधिकार व त्यासंबंधीचे कायदे काय आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व लहान मुलांचे शोषण होवु नये यासाठी काळजी घेण्याचे सांगीतले.त्यानंतर व्ही. बी. कुळकणी जिल्हा न्यायाधिश कं. १ साहेब, पुसद यांनी पर्यावरण म्हणजे कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी आवश्यक असलेले ‘वातावरण’ असे सांगितले. व आपल्या देशाच्या राज्यघटनेनी देखील जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये चांगले जीवन व सभ्यतेचे जीवन प्रत्येक व्यक्तीला जगता यावे असे म्हंटलेले आहे. म्हणजेच प्रदुषण मुक्त जीवन जगण्याचा अधिकार मानवाला दिलेला आहे. पर्यावरण हे मनुष्याला वारसा हक्कानेच मिळालेले आहे. व मानवाला देवाने ईतर पशुपेक्षा जास्ती बुद्धी दिल्याने ते पर्यावरण योग्यरित्या सांभाळुन ठेवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे असे सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगीतले की, जगातल्या ईतर देशांमध्ये पर्यावरण संबंधातुन व निसर्गाच्या सुरक्षे संबंधातुन बरीच जागृती आजपर्यंत झालेली आहे. कारण तेथे शाळांममध्ये बालवयापासुनच त्याबाबत शिक्षण दिल्या जाते. ईतर देशांमध्ये प्रदुषण मुक्त हवा चांगले अन्न मिळावे यासाठी झाडे लावणे व बाग-बगीचे तयार करणे याबाबत शिक्षण दिल्या जाते. झाडे लावुन प्राणवायु आपोआप तयार होत असतो कारण झाडे कॉर्बनडाय ऑक्साईड वायु घेतात व ऑक्सीजन वायु पर्यावरणात सोडतात त्यामुळे जंगल कटाई ताबडतोब थांबली पाहीजे व झाडे लावण्याची क्रिया सातत्याने सुरू पाहीजे. कारण आजच्या घडीला अतिप्रमाणात उष्णता वाढत आहे. व ओझोनचा स्तर कमी होत आहे. तसेच योग्य प्राणवायुसाठी कार, स्कुटर्स, मोटार सायकल यांचा वापर कमी झाला पाहीजे व धुरामुळे होणारे प्रदुषण संपले पाहीजे. आज ओझोनचा स्तर फार कमी होत चाललेला आहे. तो पृथ्वीचा ‘स्वरक्षक’ स्तर आहे. ‘कमकुवत झाल्यास सुर्याची अतिनिल किरणे सजिव सृष्टीला गंभीर धोका पोहचवु शकतात व उष्णतेची फार मोठी लाट येवु शकते. पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे इतरही जीव जंतु आहेत त्यामुळे सजिव सृष्टीची काळजी घ ोण्याची जबाबदारी मनुष्यावरच आहे. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवुन पर्यावरणाचा -हास होवु नये यासाठीच वारंवार ज्ञानदान जनजागृती केली जाते आहे. असे त्यांनी आपल्या भाषणांत मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन हे प्रथीत यश वकिल अॅड. ममता सगणे यांनी केले व पर्यावरणाची काळजी घेण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे असे त्यांनी सांगीतले त्यामुळे आजच्या दिवशी सर्वांनी प्रदुषण मुक्त जीवनाचा आनंद घेण्याचे व पर्यावरणाचा -हास न होवु देण्याचे आव्हान केले. सदर ज्ञानदान व जनजागरण कार्यक्रमास सहकार्याबदल आभार मांडलेसदर ज्ञानदार कार्यक्रमास अॅड. वाय. टी. पाठक, अॅड. सुचिता नरवाडे, अॅड. कु. सुशीला नरवाडे, अॅड. अल्पना जैस्वार, अॅड. अश्विनी जाधव, अध्यक्ष व वकिल वर्ग पुसद हे मोठया संखेने उपस्थित झाले होते. तसेच पक्षकार, महिला व पुरूष सामिल झाले होते. न्यायालयीन कर्मचारी वरीष्ठ लिपीक पेठकर, डोईजड निलेश खसाळे, विजय गवारे, सौ. बेले, डाफ निलेश यावले, स्वप्नील जोशी, आकाश भितकर तसेच पोलीस कर्मचारी, प्रदिप जाधव, संतोष राठोड, नितिन तुमडाम हे मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close