भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी पुसद शहरात भव्य तिरंगा रॅली!

पुसद : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून १०० हून अधिक अतिरेक्याना कंठस्नान घातले. सैन्य दल व जवानांच्या माध्यमातून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले हा संपूर्ण भारतीय साठी ऐतिहासिक क्षण असल्याने भारतीय सैन्य दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्याचे आभार मानण्यासाठी पुसद शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याला मानवंदना अर्पण करण्यासाठी पक्षविरहीत देशभक्त नागरिकांच्या वतीने वतीने सोमवार १९ मे रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीला सर्व समाजातील नागरिकांनी व संघटनांनी तसेच विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून देशप्रेमाचे व राष्ट्रभक्तीचे अद्वितीय दर्शन घडविले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ च्या जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमूले होते.
या तिरंगा रॅलीचे मुख्यआकर्षण म्हणजे देशभक्त नागरिकांनी शंभर मीटरचा तिरंगा ध्वज हाती घेऊन रॅलीत सहभाग नोंदवला होता.रॅलीची सुरुवात दि.१९ मे २०२५ रोज सोमवार सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास शहरातील यशवंत रंग मंदिर स्टेडियम येथून झाली. तेथून पुढे रॅलीने महत्त्वाचे मार्ग, मुखरे चौक, डॉ.. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, कापड लाईन, महात्मा गांधी चौक समोरून मार्गक्रमण करत उत्साहात तहसील कार्यालय जयस्तंभ येथे रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
तिरंग्याने सजलेले हात, देशभक्तीपर गीते आणि विविध तिरंगे के सन्मान में देशभक्त मैदान में या घोषवाक्याच्या गजरात नागरिकांनी सहभाग घेतला. या रॅलीत लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. संपूर्ण रॅली दरम्यान स्वयंसेवी संस्था , व्यापारी संघटना, विविध सामाजिक व धार्मिक तसेच राजकीय संघटना, आणि माजी सैनिक,युवक मंडळांनी देशभक्त नागरिकांनी महिला भगिनींनीही मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने उत्कृष्ट संयोजन ठेवले.
तसेच पोलीस प्रशासनाने सुरक्षितता आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण या रॅलीत पाहायला मिळाले. राष्ट्रभक्तीचा सण ठरलेल्या या रॅलीमुळे शहरात देशप्रेमाचे स्फुरण चैतन्य निर्माण झाले. सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सैन्याबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे युवकांमध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा निश्चितच जागृत झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रॅलीत भाजपाच्या नवनियुक्त पुसद जिल्हाध्यक्ष डॉ.आरतीताई फुपाटे विधान परिषद चे माजी आमदार ॲड. निलयभाऊ नाईक भाजपाचे माजी पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे, निलेश पेन्शनवार, नितीन भुतडा, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, रवी ग्यांनचंदानी, नटवर उंटवाल, महेश नाईक, हरिभाऊ फुपाटे,पंजाब भोयर,ॲड. उमाकांत पापीनवार, काँग्रेसचे नेते डॉ. मोहम्मद नदीम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद मैंद, सुधीर देशमुख, दीपक परिहार, सुरज डुबेवार, भारत अण्णा पेन्शनवार, कौस्तुभ धुमाळे, राजाभाऊ देशमुख, श्रीकांत नरसिंग, ॲड. विश्वास भवरे, राजेंद्र महाजन, विक्रांत जिल्हेवार, ओमप्रकाश शिंदे, सन्नी देशमुख, डॉ. बाळासाहेब खंदारे, संतोष आर्य, महेश आर्य, शेखर वानखेडे, संजय बयास, अनिल बयास, ताहेरखान पठाण, शेख जिया, डॉ. संजय भांगडे, योगेश राजे, रवि देशपांडे, सुधीर देशमुख, गजानन हिंगमिरे, पांडुरंग उतळे, परमेश्वर जयस्वाल, किरण देशमुख, निलेश सिंहस्ते, ॲड. जीवन नरसिंग, अविनाश देशमुख, प्रविण कदम, संदीप जिल्हेवार, अनिल चव्हाण, दीपक उखळकर, विनायक डुब्बेवार, अनिल डुब्बेवार, राजेंद्र जगताप, संजयसिंह चव्हाण, बालाजी कामीनवार, गजानन जाधव, महेश काळे, गोंविदराव कुकडे, बैस्कार, अविनाश पोळकट, भारत पाटील, रेश्मा लोखंडे, ललीत चव्हाण, डॉ. रुपाली जयस्वाल, श्रीमती दीपाली जाधव, बासंती सरनाईक,प्रतिभा मारकड, अनिता भारत पाटील, प्रसन्न बूब, शितल उतळे, ॲड. अंबिका काळे, नारायण महाराज हर्षी, मातंगऋषी गजानंद महाराज, डॉ. मनिष पाठक, उमेश रेवणवार, डॉ. शाह, नारायण मुडाणकर, सुभाष पद्मावार, सोपीनाथ माने, शिवाजीमस्के हर्षी, मोदीराज, अरुण तोंडारे, अनिल तोंडारे, अमर सोनटक्के, पाईकराव, राजु मडके, कैलास वानखेडे, अश्विन जयस्वाल, नितीन पवार, प्रतीक पाटील, ॲड. वनिता पवार पंकज असाटी माधवराव भरगाडे, सुरेश सिडाम, तसेच भाजपाचे व महायुतीचे आणि सर्वच पक्षाचे देशभक्त नागरिकांनी व महिला भगिनीं आदींनी सहभाग नोंदविला होता.या भव्य तिरंगा रॅलीचे संचालन रवि ग्यानचंदानी, ॲड. आदित्य माने व दीपक परिहार यांनी केले तर आभार भाजपाच्या पुसद जिल्हाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे यांनी मानले.