काळी ( दौ.) कडकडीत बंद! मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या हाल्याच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांचा बंदला उस्फूर्त प्रतिसाद!

काळी (दौ.) प्रतिनिधी (संदीप ढगे) अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथील मराठा समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाने व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काळी (दौ.) 8 सप्टेंबर 023 ला सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद ठेवण्यात आले. अंतरवाली सराटी येते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यावर तसेच महिला भगिनीवर बालकावर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठी चार्ज करण्यात आला.
याच वेळेस अनेक मराठा बंधू भगिनी जखमी झाले. हा हल्ला करणाऱ्या जबाबदारी असणारे अधिकाऱ्यावर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. व सकल मराठा समाजाची माफी मागावी तसेच जे आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घ्यावे. बंदच्या संदर्भातील निवेदन कु अशरा अविनाश मोरे कु मोनिका तुकाराम मोरे या दोन मराठी शाळकरी मुलीच्या हस्ते मा. तहसीलदार यांचे प्रतिनिधी तलाठी संजय वैद्य व पैठणकर साहेब यांना आपल्या मागणीपर निवेदन देण्यात आले. बाजारपेठेसह व्यापारी लाईन कडकडीत बंद ठेवून व्यापारी बांधवांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी संजय गायकवाड हंसराज मोरे शिवाजी मोरे मारुती पाटील आशिष प्रतापवार गजानन गावंडे कैलास मोरे तुकाराम मोरे संतोष मोरे वाहाब भाई उकंडा राठोड प्रकाश मोरे रमेश बनसोडे संतोष राठोड संदीप गोडसे उज्वल रणवीर मंचक रेंगे राजू मोरे इंदल जाधव अशोक आळणे देवानंद पुंड विकास मोरे गजानन पेंडकर अमोल शेवकर सुरज मोरे राहुल राऊत प्रकाश दवणे सुरत चोपडे सुभाष नेवकर ओमकार पाटील तेजस वाघमारे निखिल ढोबळे आकाश सोनटक्के विकास मांजरे शुभम पठाडे सुभाष खरे मोहित मोरे सुनील कदम देवानंद आंबोरे दत्ता बेले संदीप जासूद नागेश मोरे भगवान ईसाई सुरेश मोरे सय्यद इरफान भीमराव वानखेडे शरद काळे नथू खंदारे अंकुश कोकरे संतोष पाटील रवी मोरे अरविंद गरडे संतोष भालेराव आशिष बोके दिगंबर पठाडे बजरंग मोरे प्रदुम्न जाधव दत्ता आलाट यांच्यासह आदि मराठा समाज बांधवासह इतर समाज बांधवही उपस्थित होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोप बंदोबस्त ठेवण्यात आला होता.