भाजपाचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या उपस्थितीत पुसद जिल्ह्यातील सहा तालुक्याची जम्बो कार्येकारिणी जाहीर!

पुसद: येथील विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद जिल्ह्यातील सहा तालुक्याची नवनिर्वाचित तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळेस तत्कालीन महाविकास आघाडी सरकार मधिल काँग्रेस व उबाठा पक्षाच्यावतीने कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय घेऊन जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली होती परंतु तेच उलट खापर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेवर फोडून त्यांची बदनामी करीत आसल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने पुसद जिल्ह्यात विविध ठिकाणी दि.२१ ऑक्टोबर पासून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषेदेत देत कंत्राटी कामगार भरती म्हणजे उबाठा व काँग्रेस सरकारचे पाप आसल्याचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी यावेळी सांगितले.
भाजपाच्या नवनिर्वाचित पुसद जिल्ह्याची तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्येकारिणी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी खालीलप्रमाणे जाहीर केली. जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील चोंढीकर, रवी ग्यानचंद, नीलकंठ पाटील, सौ अनिता भारत पाटील पुसद, दत्तदिगंबर वानखडे ढानकी, अजय बेदरकर उमरखेड, सौ.जयश्री सुनील राठोड तीवरंग ता.महागाव, मधुसुधन लोहकरे दारव्हा, विलास कवाने महागाव, पंजाबराव शिरभाते नेर तर सरचिटणीस पदी निखील चिद्दरवार,अँड विश्वास भवरे, डॉ. रुपाली जयस्वाल, ऍड.अमेय नाईक पुसद, महेश काळेश्वरकर उमरखेड तर चिटणीस पदी दीपक परिहार, विश्वजित सरनाईक, सौ.प्रतिमा माणिक मारकड पुसद, सुनील टेमकर,विलास शेबे महागाव, सौ सविता पाचकोरे उमरखेड, प्रमोद बनगिनवार दिग्रस, संतोष चव्हाण नेर तर विविध मोर्च्याचे जिल्हाध्यक्षपदी महिला मोर्चा शिवानी गुगलिया नेर, किसान मोर्चा विनोद जिल्हेवार पुसद, अनुसूचीत जाती मोर्चा विजय पाटील, फुलसावंगी, ओबीसी मोर्च्या शेखर वानखडे पुसद, आदिवासी मोर्चा गणेश बुरकुले उमरखेड, अल्पसंख्यक मोर्चा अतिक मौलाना दिग्रस तर आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी महेश मिश्रा,उद्योग आघाडी यश अग्रवाल, व्यापारी आघाडी सुरज डूबेवार, उत्तर भारतीय आघाडी संजय पांडे, भटके विमुक्त आघाडी देवराव जाधव सर्व पुसद, प्रकोष्ट आघाडी जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक समन्वय हभप भारत महाराज घोगरे पुसद, पदवीधर मनोज ठाकरे भोजला, क्रीडा प्रकोष्ट प्यारेलाल पवार दिग्रस, जैन प्रकोष्ट राजू गुगलिया नेर, राजस्थान प्रकोष्ट संजय भांडरी पुसद तर भाजपा प्रणित सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी दक्षिण भारतीय सेल राजू राजू गोलापल्ली पुसद, वैधकीय सेल डॉ गणेश राठी दारव्हा, कायदा सेल शैलेश बल्लाळ दारव्हा, सहकार सेल बळवंतराव नाईक उमरखेड, मच्छिमार सेल सुनिल सोनुने नेर,ट्रान्सपोर्ट सेल अमोल घुमनर मुडानकर, माजी सैनिक सेल तुळशीराम जाधव उमरखेड, जेष्ठ कार्येकर्ता सेल श्याम जोशी पुसद, दिव्यांग सेल बाबूसराव पवार, बुद्धिजीवी सेल दिलीपराव राकडे नेर, शिक्षक सेल पंजाबराव सुरोशे पुसद, आयुष्यमान भारत सेल अनिल भरारे दिग्रस, सांस्कृतिक सेल ओमप्रकाश गवई पुसद, आयटी सेल सतिष मुटकुळे उमरखेड, ग्रामपंचायत ग्रामविकास सेल अंबादास जाधव दारव्हा, बेटी बचाव बेटी पढाव सेल मंजू बनगिनवार दिग्रस,सोशल मीडिया सेल प्रतिक चव्हाण पाटील पुसद, इंजिनिअर सेल मनोज पांडे अशी जिल्हा कार्येकारिणी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी दि.२०ऑक्टोबर रोजी स्थानिक शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषेदेत जाहीर केली. यावेळी आ.ऍड.निलंय नाईक, अनिरुद्ध पाटील चोंढीकर,निखिल चिद्दरवार, ऍड.अमेय नाईक,नीलकंठ पाटील, ऍड.विश्वास भवरे,अश्विन जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यात लवकरच निरीक्षक नेमण्यात येऊन सबका साथ,सबका विकास व सबका विश्वास या उक्तीप्रमाणे भाजपाचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम तालुका निरीक्षक करतील असा विश्वास महादेवराव सुपारे यांनी व्यक्त केला.



