क्राइम

पुसद शहरात वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार; वरिष्ठाचे आदेश असल्याचे भासवून सर्वच वाहतूक पोलिसांची पठाणी वसुली!

पुसद : शहरातील वाहतूक शाखेचे सर्वच वाहतूक पोलीस कर्मचारी वरिष्ठांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी शहराच्या वेशीवरच्या रस्त्यावरील चौका चौकात२४×७ म्हणजे आठवड्यातील सातही दिवस नॉन स्टॉप पठाणी ‘वसुली’ करत असल्याचे सध्या चित्र पाहावयास दिसत असून वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली हाच प्रश्न रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सतवु लागला आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे शहरातील मुख्य चौकात सतत वाहतूक कोंडी जाणवतात असून वाहतूक शाखेत आधीच तोकडे असलेले वाहतूक पोलीस मात्र ही वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी पठाणी वसुली चे काम करत असल्याचे दिसून येत आहे याकडे मात्र लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे की अभय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

पुसद शहरात मागील काही दिवसांपासून रस्त्याचे कामे  सुरू आहेत हे रस्ते आता डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे फेरीवाले, हातगाडी वाल्यांमुळे सेवा रस्ता अधिच अरुंद झाले असून या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.चौकातील वाहतूक नियंत्रक पोलिस कर्मचारी तैनात नसल्याने व वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे न पाहता आपली वाहने पुढे जाण्याच्या नादात वाहने आडवी, तिरपी चालविणाऱ्या बेशिस्त चालकांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस मात्र वसुलीच्या नादात आहे.

दुकानदारांना आपल्या दालनासमोर स्वतःची पार्किंग नसल्याने दुकानदार व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आपली बहुसंख्य वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर दिवसभरात सातत्याने वाहतूक कोंडी जाणवते त्यातच वाहतूक नियोजनासाठी पोलिसांचा अभाव व वाहतूक पोलिसांचे नियोजनच नसल्याने या वाहतूककोंडीचा नाहकत्रास सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारक तसेच विद्यार्थ्यांना  सहन करावा लागत आहे. परंतु ज्या पोलिसावर वाहतुकीची जबाबदारी आहे ते मात्र वाहनांची तपासणी करण्यासाठी व वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश असल्याचे भासवून वाहनधारकांना २०० रुपयाची पावती देऊन ३०० ते ५०० रुपयांची पठाणी वसुली करत आहेत. तर पावत्या करण्याची परवानगी वाहतूक निरीक्षकांनी दिली असल्याचे वाहतूक पोलिस प्रत्येकाला सांगत आहेत असे सध्या पुसद परीसरात सर्वत्र दिसत आहे.शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक पोलिस अनेकदा वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीत दंग असल्याचे चित्र असताना, या रस्त्याने येणारे-जाणारे वाहनचालक हेरण्याचे काम वाहतूक पोलीस करीत असुन शहरातील पी.एन.कॉलेज जवळील सुधाकरराव नाईक चौकात वाहनधारकांचे वाहने अडवून लायसन्सची व इतर कागदपत्राची मागणी केली जात आहे. बऱ्याचदा वाहनचालकांकडे कागद पत्रे नसल्याचे सांगताच त्याला दंड भरण्याच्या सूचना वाहतूक पोलीस कर्मचारी करीत असून नवीन कायद्याने तुम्हाला अमुक अमुक क एवढा दंड आकारला असे दमदाटी करीत आहेत काही वाहनाच्या चाव्या काढून घेतला जात आहे मालकाकडे भरभक्कम आकारलेल्या दंड नसल्यास वाहतूक पोलीस पन्नास टक्के दंडावर येतात व त्यातून तडजोड केली जाते त्यावेळी वाहन धारकाला कोणतीही पावती सुद्धा दिली जात नाही किंवा रक्कम जास्त घेतली जात असून पावती मात्र दोनशे रुपयांची फाळली जात आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य वाहनधारकांची वाहतूक पोलिसांकडून लूट सुरू असल्याचे ही नागरिकांकडून सांगण्यात येते असा प्रकार सर्वच पुसद परिसरातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याकडून सर्रासपणे चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. ड्युटीवर हजर असलेला गणवेशाधारी वाहतूक पोलिस हा सर्व प्रकार खुल्याम करीत आहेत. हप्ते खाऊ पोलीस अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरातील अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे. तर या अवैध वाहतुकीचे हप्ते गोळा करणारे सुद्धा काही खाजगी एजंट नेमल्याचे सूत्राची माहिती असून यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अवैध वाहतुकीला आळा घालण्याऐवजी वाहतुकीस प्रोत्साहन देऊन वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी स्वतःच्या खिसे गरम करत आहे.शहरातीलमुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभेअसताना त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलिसांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूकदार वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात,असा आरोप नागरिकांनी केला आहे. परंतु यांनी दर महिन्यात काही ना काही हप्ते ठरवून घेतल्यामुळे हे असे प्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु हे वाहतूक पोलीस मात्र सर्वसामान्यांकडून पठाााणी वसुुुली करून सर्रासपणे लूट करीत असल्याचे चित्र आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close