क्राइम

पुसद शहरात अवैध मटका, व्यवसायाला अच्छे दिन; अवैध धंदे सुरू नसल्याची हामीपत्र आदेशाची संबंधित ठाणेदाराकडून पायमल्ली!

पुसद : पोलीस उप विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मटका व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे. यापूर्वी ठोस पावले उचलून मटका बुकी मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिल्हा पोलिस प्रशासनाला पुसद शहरातील व तालुक्यातील मटका जुगार, बंद करण्यात अपयश येत असल्याने या  अवैध मटका चालविणाऱ्यांना कोणत्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याचे अभय आहे याची सर्वत्र खमंग चर्चा असून आश्चर्य व्यक्त होतं आहे.जिल्ह्यातील तालुक्यात कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे चालू द्यायचे नाहीत, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांचे काही दिवसापूर्वीचे असतात मात्र पुसद पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे मटका खुल्लेआम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. त्याला पाठबळ मिळत असेल तर ठोस कारवाई केली जाईल. यासाठीच प्रत्येक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याकडून हमीपत्र भरून घेण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा पोलीसाचे होते मात्र शहरातील मोक्याच्या ठिकाणी अवैध मटका खुल्लेआम सुरू या आदेशाची संबंधित पोलीस उपविभागात उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदाराकडुन या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णत: बंद करणे कुणालाच शक्य नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवून त्याची तीव्रता कमी करता येते, असे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये वचक निर्माण करता येते, सातत्याने कारवाई केल्यास अवैध धंदे चालविणाऱ्याचे धाबे दणाणतात व त्यावर अंकुश लागते मात्र या पोलीस उपविभागाच्या हद्दीत तसे होताना दिसत नाही मागील काही दिवसांपुढे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या वतीने थोडीफार कारवाई केली होती परंतु स्थानिक पोलीसाची या अवैध धंद्यावाल्याशी हात मिळवनी असल्यामुळे हे अवैध धंदेवाले खुलेआम मनमर्जीप्रमाणे आपले अवैध धंदे चालवीत आहे.शहरात विविध ठिकाणी भर चौकात व गल्लोगल्ली मटक्याच्या पट्ट्या खुलेआम घेतल्या जातात शहर पोलीस स्टेशन हक्केच्या अंतरावर आहे तरीही जागोजागी मटका बुकी खुल्लेआम रस्त्यावर पट्ट्या फाडतात दिसतात तर या पोलीस उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुल्या अवैध धंदे मटका जुगार सुरू असून त्यांना खाकीचे अभय आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावाल्यांना खाकीचा धाक उरला नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.तर या अवैध मटका बुकिंना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्याचे अभय जर असे असेल तर नेमका तो हप्तेखोर व दर महिन्याला लाखोंची वसुली करणारा पोलीस कर्मचारी कोण ? असा प्रश्न पुसद शहरातील सूज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close