क्राइम
धनोडा येथे अवैद्य देशी दारू विक्री मटका जोरात!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत येत असलेल्या धनोडा येथे अवैध देशी दारू विक्री व मटक्यान उच्चाद घातला असून विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी काठासह जागोजागी मटका काउंटर सुरू असून माहूर तालुक्यातील मटका शौकीन मटका लावण्यासाठी येत असल्याचे दिसत आहेत सर्वसामान्य नागरिकासह महिला शाळकरी मुलांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे मागील अनेक दिवसापासून होत असलेली अवैद्य दारू विक्री यामुळे अनेकांची सुखी संसार भांडण तंट्यामुळे उध्वस्त होत आहे यामुळे धनोडा गावाची शांतता भंग होत असून लहान मुलासह महिलां सुद्धा मटक्याचे आहारी जात आहे सध्या मोलमजुरी मिळत असल्याने शौकिकांना मटक्याचा शोक लागला आहे यावर महागाव पोलिसांनी लगेच पायबंध घालण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



