ईतर

घरफोड्या करणारा अट्टल चोरटा अखेर पोलीसांच्या ताब्यात! 

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीत येत नसलेला गुन्हेगाराच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आरोपीचे नाव राजू पुरुषोत्तम पोटे (४७) रा. नवीन लालगुडा असे आहे. अनेक विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या राजुचा पोलिस कसून शोध घेत होते. राजू वाघदरा येथील नदी काठाजवळ दडून असल्याचा सुगावा गुन्हे शोध पथकाला लागला ते त्याठिकाणी पोहचले. पण पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने त्याठिकाणाहून पळ काढत असतानाच शोध पथकांनी त्याचा पाठलाग करून वणी शासकीय आयटीआय कॉलेज जवळ त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय माधव शिंदे, सपोनि सुदाम आसोरे, विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close