“हर्षल पाटील यांची आत्महत्या नाही तर सरकारनं घेतलेला बळी”-महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा आरोप!
हर्षल पाटील यांना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेकडून वाहीली श्रध्दांजली!

पुसद : राज्यात नुकतीच आत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजने अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे सांगली जिल्ह्यातील एक तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याने थकबाकी देयके न मिळाल्याने शेतात गफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली आहे. शासनाकडे सुमारे दीड कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे कंत्राटदार संघटनेमध्ये असंतोष निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना व राज्य अभियंता संघटनेच्या वतीने आज दिवंगत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. परिस्थिती काहीही असो, माणसानं नेहमीच धैर्यानं अडचणींचा सामना केला पाहिजे असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलींद भोसले यांच्या नेतृत्वात मागील १ वर्षा पासुन शासना सोबत देयक मिळवणया करीता पाठपुरावा केला जात आहे. एकट्या हर्षल पाटील नव्हे तर राज्यातल्या अनेक कंत्राटदारांची बिल राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनेच्या केलेल्या कामाचं शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नसल्यानं सरकारच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराला आत्महत्या सारखे पाऊल उचलावे लागेल की काय.? असा प्रश्न कंत्राटदारासमोर निर्माण झाला आहे.शासनाकडे देयक मिळविणया करीता जवळपास २००० पत्राचा पाठपुरावा केला असून शासनाची तिजोरी रिकामीच आहे.राज्य सरकार शासनाच्या विविध योजनांचा निधी लाडक्या बहीनीसाठी वळविला आहे तर इकडे त्याच बहीनी चा नवरा/भाऊ, ठेकेदार/मटेरियल पुरवठादार/ मजुर असल्यामुळे देयक न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ यांच्यावर आली आहे. कंत्रटदाराकडे लेनदार व बँका रोज चक्रा मारत आहेत त्यामुळे राज्यातील प्रत्येक कंत्राटदार मेटाकुटीला आला आहे.हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजितदादा आणि गुलाबराव पाटील यांनी, हर्षल पाटील यांचे कोणतेच बील थकीत नसून त्याला जिल्हा परिषदेकडून कोणतेही काम देण्यात आलेले नाही असा खुलासा केला आहे.मात्र अजितदादा पवार यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांने चुकीची माहिती दिली असावी त्यामुळे आता राज्य कंत्राटदार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून शासनाने पैसे अडवल्यानेच आर्थिक विवेचना निर्माण झाली आणि त्यातूनच हर्षल पाटील याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेने केला आहे. त्या बाबत संपुर्ण पुरावे संघटने जवळ आहेत त्यामुळे शासनाच्या विरुद्ध राज्यातील सर्व कंत्राटदार आकरामक आहेत. लवकरच मुख्यमंत्री सोबत या बाबत संघटना बसणार आहे.. मृतकाला न्याय मीळण्या करिता संघटना प्रयतनशील आहे. तसेच इतर कोणी ही अशी टोकाची भुमीका घेवु नये संयम राखावे असं संघटना आवहान करते.यावेळी सैय्यद अन्वर अली, जिल्हाध्यक्ष, कंत्राटदार महासंघसैय्यद राजेश आसेगावकर , ननहे भाई, वैभव बजाज, योगेश पांडे, संजय बाबा, मुन्ना हेडा, मंगेश पलीकोंडावार, अमोल नाईक, निलेश पटेल, गजु निकम, रोशन पवार,रमेश, अशफाक शेख, स्वप्निल पवार, सचिन राठोड, सोहैल बाळापुरे,शुभम राठोड अदी कंत्राटदार उपस्थित होते.



