ईतर

भव्य मोफत रोगनिदान व औषधी वितरण शिबिर संपन्न! 

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील बाबापुर येथे भव्य मोफत रोगनिदान व औषधी वितरण शिबिर घेण्यात आला. या शिबिराचे आयोजन ठाकरे क्लिनिक व रमेश मेडिकल, कायर यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरात नोंदणी करत रोगाचे निदान व औषधी वितरण शिबिराचे लाभ घेतला. तसेच बाबापुर येथील सुप्रसिध्द गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने तालुक्यातून भाविक येत असतात. यावेळी या शिबिरामध्ये भाविकांनी नोंदणी केली. गावकऱ्यांनी ठाकरे क्लिनिक व रमेश मेडिकल यांचे या मोफत शिबिर आयोजन केल्याने त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close