क्राइम

मधुकर नगर येथील गांजा विक्रीसाठी बाळगणारा इसम जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!३ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त!

वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना!

पुसद : स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसिबी)विभाग यवतमाळ कॅम्प पुसदचे पथक ता.२०मेरोजी वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकेश्वर मंदिर परीसरात १७/३५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना पाचपिर दर्ग्या जवळ एक इसम कापडी पिशवी घेऊन मोकळ्या जागेत संशयितरित्या फीरताना दिसून आला त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने कौशल्याचा वापर करून या संशयितास ताब्यात घेऊन त्याचे नाव गावाची विचारपूस केली असता या संशयिताने शेख कलीम शेख हाजी असे सांगितले तेव्हा त्याच्या हातातील पिशवीची झडती घेतली असता त्या पिशवीत खाकी रंगांचे पॉकीट मिळुन आले त्यावेळी या पॉकीटाचा एक कोपरा फोडून पाहिले असता त्यामध्ये हिरवट मळकट रंगाचा गांजा अमली पदार्थ मिळून आल्याने गांजाची अवैध विक्री करणाऱ्या या इसमाला बुधवारी (ता २०) जेरबंद केले आहे. आरोपीकडून सुमारे ३ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे ६८हजार ६०० रुपये इतकी असून याप्रकरणी आरोपी विरुद्ध वसंत नगर पोलिस ठाण्यात (एनडीपीएस) ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख कलीम शेख हाजी वय ५४ वर्ष, रा. मधुकर नगर ता. पुसद जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच पोलीस उपविभागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता ड्रग्ज तस्कर व गांजाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे (एलसिबी)शाखा यवतमाळ कॅम्प पुसदच्या पोलिसांचे पथक दि,२०मे २०२६ रोजी वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मौजे धनकेश्वर मंदीर परिसर सायंकाळी १७/३५ वाजता पाचपिर बाबा दर्ग्या जवळील मोकळया जागेत एक इसम हातात कापडी घेवून संशयीरित्या उभा असतांना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन मोठ्या शिताफिने संशयीत इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) शेख कलीम शेख हाजी वय ५४ वर्ष, रा. मधुकर नगर ता. पुसद जि. यवतमाळ येथील रहिवाशी असल्याचे सांगितल्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या लाल पट्टा राखडी रंगाची कापडी पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये चार खाकी रंगाच्या टेपने चिटकवून असलेले पॉकीट मिळून आल्याने सदर पॉकीट मध्ये काय आहे ? याबाबत पॉकीटला एका कोप-यातून छिद्र पाडून चारही पॉकीटची तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट मळकट रंगाचा गांजा अंमली पदार्थ एकूण ३ कीलो ४३० ग्रॅम वजनांचा एकूण किंमत ६८,६००/- रु मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेऊन नामे १) शेख कलीम शेख हाजी वय ५४ वर्ष, याला वसंत नगर ठाण्यात नेवुन त्यांचे विरुध्द (एनडीपीएस) ॲक्टनुसार अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १८८५ चे कलम ८ (सी), २० (ब), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला जेरबंद केले.स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी नागरीकांना काही माहिती असल्यास नागरीकांनी निर्भयपणे पोलीसाची कोणतीही भिती न बाळगता माहिती पुरवावी पुरवावी त्यांचं नाव सुध्दा उघड केले जाणार नाही असे आवाहन पोलीसांनी केले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा तसेच मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे सा, (भा.पो. से) सा मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, सफो संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close