महागाव पोलीस स्टेशन येथे स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन: ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव पोलीस ठाण्यामध्ये यावर्षी प्रथमच दिनांक १९ सप्टेंबरला गणेश चतुर्दशीला विघ्नहर्ता गणपती बाप्पाची स्थापना ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आली होती महागाव पोलीस ठाण्याने मात्र पारंपारिक आणि समाजाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श उभा केला आहे.
भर पावसात काल २५ सप्टेंबरला अनेक पुरुष ,महिला,भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात महागाव पोलिस ठाण्याच्या आवारातून मिरवणूक काढत गणपती बाप्पांचे उल्हासात पूस नदीपात्रात विसर्जन केले शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी सुद्धा महाप्रसादाचे वाटप केले यावेळी सर्व पोलीस बांधवांनी अथक परिश्रम घेतले गणेशोत्सव कसा असावा याचा वस्तुपाठ पोलिस प्रशासनाच्या गणेश मंडळाने उभा केला.पावसानेही वृष्टी करीत गणपती बाप्पाचा जणू आशीर्वादच घेतला. यावेळी ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी स्वतः बाप्पांची मुर्ती विराजमान असलेल्या ट्रॅक्टरचे सारथ्य करून सर्वांच्या मनात आपले आदराचे स्थान निर्माण केले. माता भगिनींनी हाती टाळ व पताका धरून विसर्जनाच्या मिरवणुकीत भजने सादर केली. सर्व पोलीस कर्मचारी या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते.