क्राइम

गांजा विकणाऱ्याच्या घरी धाड;स्थागुशाने ५१ हजार ९६४ रूपयाचा मुद्देमाल केला जप्त!

पुसद: तालुक्यात माळ पठारावरील रोहडा येथील रहिवाशी असलेला युवक गांजा विकत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकला गुप्त सुत्रांकडून मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान रोहड येथील घरात धाड टाकली.संपुर्ण घराची झडती घेतली असता घरातील एका लाकडी बेडच्या रकान्यामध्ये तब्बल २ किलो १८२ ग्रॅमचा गांजा आढळून आला आहे.रात्री बारा ते एक वाजेपर्यंत कारवाई चालली होती हे विशेष. गांजा विकणाऱ्या युवकाला देखील ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे.गजानन किसन टोम्पे वय ४२ रा .रोहडा वर्षे असे गांजा विकणाऱ्या युवकाचे नाव असून त्याला अटक केले आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार रोहड येथे राहणारा गजानन टोम्पे हा विनापरवाना गांजाची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती स्थागुशाला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे,अमोल राठोड,रेवण जागृत,तेजाब रणखांब,सुभाष जाधव,कुणाल मुंडोकार,ताज मोहम्मद यांच्यासह वसंत नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर पंत व शासकीय पंचासह रोहड येथे टाकली.घराच्या झडतीत लाकडी पलंगामध्ये पलंगातील एका रकान्यामध्ये ४० हजार ३६३ रूपयाचा २ किलो १८२ किलोग्रॅमचा गांजा आढळून आला आहे.गांजा पॅकिंग साठी लागणारी सिलिंग मशीन, प्लास्टिक पन्नी व इतर साहित्य असा एकूण ५१ हजार ९६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रात्री बारा ते एक वाजेपर्यंत चाललेल्या कारवाईमध्ये परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close