ईतर

शिवपांदन रस्ता तात्काळ खुला करण्याच्या मागणीसाठी वरोडी येथील शेतकऱ्यांचे महागाव तहसील समोर आमरण उपोषण!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):महागाव तालुक्यातील मोजा वरोडी येथील शेतकऱ्याने मागील चार वर्षापासून शिव पांदण रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाचे दरबारी हेलपाटे मारले , शेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे हतबल शेतकऱ्यास शेवटी महागाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे.

मोतीराम तुकाराम अडकिने असे अन्यायग्रस्त व अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त असलेले शेतकऱ्याचे नाव असून सन २०२१ पासून शेताकडे जाणारा रस्ता खुला करून देण्यासाठी वारंवार लेखी तक्रार व तोंडी विनंती करूनही आजपर्यंत मौजा वरोडी ते कासारबेहळ शिव पांदण रस्ता महसूल विभागाच्या हलगर्जीपणा मुळे आज पावेतो खुला करण्यात आला नसून ,या मागणीसाठी शेवटी आमरण उपोषणाची हत्यार वृद्ध शेतकऱ्यास उपसावे लागले आहे, यापूर्वी तक्रारीवरून चार वेळा केवळ मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे शेतकऱ्याने बोलताना सांगितले . सदर शेतकरी हा नदीकाठच्या काठाने किंवा शेजारील शेतकऱ्याला विचारून सध्या आपली शेती वही ती करत आहे त्यांनी प्रशासनाला दि.२७/०४/२३ ते १०/०५/२३दरम्यान चार वेळा पत्रव्यवहार केला असून ते तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचे उंबरठे चढून चढून थकले आहेत
मशागतीचे काम प्रगतीपथावर असताना मोतीराम अडकिने यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पुढील पीक खायचा कसे हा प्रश्न उभा ठाकला आहे दि.३० मे पर्यंत रस्ता खुल्ला केला नाही तर नाईलाजाने दि. ३१ मे रोजी महागाव तहसील समोर उपोषणास बसावे लागले आहे वृद्ध शेतकऱ्याचे महसूल प्रशासन आणि संबंधित विभागाने जी हेळसांड मांडली आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या विचाराच्या बाहेर आहे , शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता त्वरीत उपलब्ध करून करावा अशी मोतीराम अडकिने यांनी मागणी उपोषणाच्या माध्यमातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close