महागाव तालुका पत्रकार महासंघाची स्थापना व पदाधिकाऱ्यांची निवड!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, संजयभाऊ भगत, विनोदभाऊ कोपरकर यांच्या मार्गदर्शनातदि.१७ सप्टेंबरला शासकीय विश्रामगृह महागाव येथे तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत महागाव तालुका पत्रकार महासंघाची स्थापना करण्यात आली.
यावेळी संजय भगत, गजानन वाघमारे, उत्तमराव चिंचोळकर, तसलीम शेख, भैय्या पाईकराव, राजू गिरी, संदीप कदम, शैलेश वानखेडे,या पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केले महागाव तालुका पत्रकार महासंघच्या अध्यक्षपदी गणेश भोयर, उपाध्यक्ष विवेक पांढरे, सुनील चव्हाण,कोषाध्यक्ष मंचकराव गोरे, सचिव अमोल राजवाडे,सहसचिव नरेंद्र नप्ते ,सरचिटणीस तस्लीम शेख ,शहराध्यक्ष संजय कोपरकर उपशहराध्यक्ष पवन रावते,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी पत्रकार डॉ.गजानन वैद्य,श्रीधर देशमुख, भगवानराव फाळके, संदीप कदम, सचिन उबाळे, मारुती देशमुख ,संजय जाधव, चंद्रशेखर खंडाळे ,सचिन चिलकर ,शैख अनिस, तानाजी शिंदे, रियाज पारेख, रवि वाघमारे ओमप्रकाश देशमुख ,मनोज सुरोशे ,ईश्वर राऊत ,उमेश गाडे, अमोल राजवाडे ,खुशाल खंदारे, गजानन बोक्से , गजानन साबळे,शैलेश पेंटेवाड ,विवेक शेळके, दिगंबर दरोडे ,राजेंद्र गिरी, बिहारी जसस्वाल, डॉ.अशोक राऊत, गजानन दरोडे,लक्ष्मीकांत सरकाटे ,अंकुश कावळे, मंचकराव गोरे ,सदानंद लेहेवार ,शैलेश कोरडे ,उत्तमराव चिंचोलकर सर्व पत्रकार व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.