ऐन हिवाळ्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण ३० हजार हेक्टर क्षेत्र बाधित तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी!

पुसदः तालुक्यातील मागील दोन तीन दिवसापासुन सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले या दोन दिवसात सोमवारी ४८.९ मिलीमीटर व मंगळवारी ५७ मिलीमीटर एकुण १०५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस, तूर, हरभरा, गहू व केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार महादेव जोरवर व कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीची आकडेवारी जिल्हाधिकारी यांना सादर केली आहे. या पावसामुळे तालुक्यातील चिखली येथे वीज कोसळुन एक बैल तर शेंबाळपिंपरी शेतशिवारात पाच मेंढ्या ठार झाल्या आहेत. उमरखेड रस्त्यावरील शेलु गावाजवळील नाल्यालापूर आल्यामुळे बससेवा सुध्दा ठप्प झाली होती.तर पार्डी गावाला जोडणारा नाला ओसंडून वाहत होता.
पुसद तालुक्यात दोन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे.तालुक्यातील १८९ गावे अवकाळी पावसाने बाधित झाले. एकूण १९ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचे नुकसान झाले. त्या खालोखाल तुर पिकाला फटका बसला.
एकूण ४ हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील तूर पिक पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर लोळले. एकुण ३ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान झाले. एकूण २ हजार ३४० हेक्टर क्षेत्रावरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच ५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाला फटका बसला आहे. महसुल व कृषी विभागाने नजर अंदाज नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.महसुल व कृषी विभागाने नजर अंदाज नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
तर या अवकाळी पावसाने पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे, या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला या संदर्भात विधान परिषद सदस्य आमदार ॲड.निलयभाऊ नाईक तसेच पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भीषण वास्तव्य सांगितले असुन तथा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित महसूल विभागाला व कृषी विभागाला दिले असून शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वस्त दिले, याप्रसंगी जि .प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष उपस्थित होते.