महागाव तालुक्यात शेतीचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान:शेत जमिनी खरडल्या!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- शुक्रवारी २१ जुलैला मध्यरात्रीपासून महागाव तालुक्यातील लेवा, काऊरवाडी, राऊतवाडी, खडका, वाघनाथ, आंबोडा, करंजखेड, कासारबेहळ, इजनी, भोसा, दहीसावळी, धनोडा, हिवरा संगम,थार बुद्रुक, संगम,अनंतनगर, राहुर, शिरपूली, वरोडी, यासह परिसरातील अनेक गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले परिसरात शुक्रवारपासून सततधार पावसाला सुरुवात झाली ती शनिवारीही सुरूच होती. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे.ओढा नाल्याला पूर आल्यामुळे व पावसाचा जोर वाढतच राहिल्यामुळे पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतीसह पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की पिकांबरोबर शेतजमिनी सुद्धा खरडून गेल्या अनेकांचे स्पिंकलर सट, तोट्या, पाईप, शेता नदीकाठातील गोठे यासह शेतातील मातीसुद्धा पाण्यात वाहून गेली. शुक्रवार दिनांक २१जुलै रोजी रात्री महागाव तालुक्यातील माळपठारावरील भागात भरपूर पाऊस झाला या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.या अतिपावसाने पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतजमिनीची पिके ही खरडून गेली आहे. अशा भयंकर पावसामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदाच्या हंगामात मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून, कर्ज काढून उसनवारीने पैसे घेऊन शेतीत पेरणी केली. बी बियाणे टाकले. पिकांना खते दिली. पिकाची स्थिती उत्तम असतानाच शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
मी अल्पभूधारक शेतकरी असून माझा उदरनिर्वाह
शेतीवरच आहे नाल्याच्या पुराच्या प्रवाहाने माझ्या शेतातील पीक पूर्णतः वाहून गेली असून शेत जमीन पूर्णतः खरडली आहे मोटार पंप व स्पिंकलर सट वाहून गेले शासनाने तात्काळ मदत करावी हीच अपेक्षा-शिवचरण आंडगे(शेतकरी हिवरा संगम)



