ईतर

पुसद तालुक्यात विज कोसळल्याने एका घटनेत शेतकऱ्यांचा मृत्यू तर दुसऱ्या घटनेत एक बैल ठार!

पुसद: तालुक्यात शुक्रवारी (ता.२९) दुपारी विजेच्या कडकडाट धुवाधार झालेल्या पावसात गायमुख नगर शेतशिवारात वीज कोसळून वालतुर रेल्वे येथील शेतकऱ्याचा एक बैल दगावला आहे तर बांन्शी येथील एका शेतकऱ्यांचा विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटात आलेल्या धुवाधार वादळी पावसाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. गायमुख नगर येथील शेतशिवारातील शेत सर्वे नं.२/२वालतुर रेल्वे येथील शेतकरी मंगलराव गोविंदराव गायकवाड यांनी शेतातील झाडाखाली एक बैल बांधला होता तर दुसरा बैल झाडापासून दुर अंतरावर बांधला होता अचानक आभाळ भरून आले व विजांच्या कडकडाटात धुवाधार पाऊस सुरू झाला अचानक विज झाडावर व बैलावर कोसळल्याने एक बैल जागीच दगावला या बैलाची किंमत अंदाजे पन्नास हजारांपेक्षा जास्त असल्याने या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे संबंधित तलाठी पशुधन अधिकारी यांनी पंचनामा करून तहसील प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी तर दुसऱी घटना तालुक्यातील बान्सी येथील रहिवासी असलेल्या शेतकरी सुरेश बाबाराव हुडेकर वय ४५ वर्षे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

ता.२९सप्टेंबर २०२३ रोजी १.४५ दुपारी शेतात काम करीत असताना अचानक धुवाधार पावसाने विजेच्या कडकडाटात हजेरी लावल्याने शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी ग्रामसेवक पी.आडे,तलाठी एस.बी.ढगे व पोलीसांच्या मदतीने तहसीलदारकडे अहवाल सादर केला आहे.या दोन्ही घटनेतील पिढीत शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close