ईतर

रोहीच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी!

पुसद :अनसिंग येथून बेलोरा या गावी येत असतांना दुचाकीला रोही ने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेलोरा येथील दुचाकी स्वार संजोग इंद्रकुमार करेवार ( ३५ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. संजोग व त्यांचा पुतण्या स्वप्नील दीपक करेवार वय १८ वर्षे हे दोघे अनसिंग येथून दुचाकी क्र. एम एच २९ बी डब्लू, ४१६४ ने बेलोऱ्या कडे परत येताना वाशीम पुसद रोडवर पन्हाळा फाटा ते मांजरजवळा दरम्यान गिट्टी खदान जवळ रोह्याची दुचाकीला धडक लागल्याने संजोग यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

त्यांना उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर स्वप्नील ह्यास किरकोळ मार लागला आहे. दरम्यान अपघात ग्रस्ताला वन विभागाकडून अद्याप मदत मिळालेली नाही. ती मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close