ईतर

पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी सर्कलमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीचे परवाने वाटप!

पुसद:राज्य शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार, प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी अशा विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत देण्याच्या धोरणानुसार तालुक्यातील शेंबाळपिंपरी दगड धानोरा येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ रेतीचे प्रत्यक्षात ट्रैकर भरून तहसीलदार रेखा वाणी (मोहिते) मॅडम यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी अशीष बिजवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.५) करण्यात आला.रेती घाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाने मागील काही वर्षांपासून रेती घाटाचा लिलाव केला नसल्याने रेती मिळविणे मोठी तारेवरची कसरत झाली होती यात विशेष म्हणजे, चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध होत असली तरी ती अधिकच्या किमतीत रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते.परिणामी शेकडो गोरगरिबांची मंजूर झालेलीे घरकुलाची बाधकामे रेतीअभावी रखडली होती.त्यातच तालुक्यात तब्बल हजारो घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. या अनुषंगाने काही लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आल्या. काहींना अनुदानही वितरित करण्यात आले, मात्र यातील बहुतांश लाभार्थी स्वमालकीच्या जागेवर मोडक्या- तोडक्या राहणारे तसेच घरं नसलले आहेत त्यामध्ये शासनाचे तोडके अनुदान त्यात भिषण माहगाई त्यामध्ये घर बांधणे शक्य नसल्याने जवळील काही जमापुंजी, उसनवारी करून या संकटावर मात करून  लाभार्थ्यांनी ही कामे हाती घेतली. त्यातच बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरामुळे हे बजेट आणखीनच वाढत गेले, त्यातच घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याची घोषणा कागदावर त्यामुळे घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे या विवंचनेत लाभार्थीं होते परंतु आता  लाभार्थ्यांना ज्याच्या त्याच्या तालुक्यातच रेती उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय आधिकारी आशिष बिजवाल तहसीलदार रेखा वाणी (मोहिते) मॅडम गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड व दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून वाळू धोरणानुसार घरकुल धारकांना ५ ब्रास रेती उपलब्ध करण्याचे नियोजन केले.व या लाभार्थ्यांना शेंबाळपिप्री सर्कल मधिल पैनगंगा नदीवरील पिंडावरच्या रेतीचे ५ब्रास रेतीचे परवाने देवुन घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून दिली त्यावेळी सर्व लाभार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार रेखा वाणी(मोहिते)मॅडम तसेच वरिष्ठ लिपिक दिलीप कोल्हेवाड या भागाचे मंडळ अधिकारी भोरे,तलाठी राजीक सय्यद, यांनी अथक प्रयत्न करून लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली त्याबद्दल सरपंच प्रदीप देशमुख दगड धानोरा,सरपंच प्राजक्ता संभाजी माने यांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले. हे रेती परवाने मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close