श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाभिक समाजाच्या सांस्कृतिक भवन व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी!

पुसद: नाभिक बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर समस्त नाभिक समाजाच्या वतीने नाभिक सांस्कृतिक भवनाच्या बांधकामा करिता श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओपन स्पेस (खुल्ली जागा) उपलब्ध करून देण्याची मागणी नाभिक उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोपाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सकल नाभिक समाजाच्या वतीने श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सरपंच यांना निवेदन देण्यात आले. नाभिक बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर ही तालुक्यातील नाभिक समाजासाठी समाज उपयोगी कार्य करीत असून समाजाचे विविध कार्यक्रमांकरीता आमच्या समाजासाठी सभागृह नसल्यामुळे आमची नेहमी गैरसोय होते त्यासाठी पुसद तालुक्यातील समस्त नाभिक समाजाच्या वतीने श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे यांना नाभिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोपाल जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली निवेदन देण्यात आले असून ग्रामपंचायतचे हद्दीतील ओपन स्पेस (खुली जागा) नाभिक समाजाचे श्री संत सेना महाराज सभागृह व सांस्कृतिक भवनासाठी राखीव करून देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी नाभिक समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.