ईतर

मारवाडी फाटा ते रोहड्या कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम पुन्हा निकृष्ट दर्जाचे ;काही वर्षांपूर्वी करोडो रुपयांचा निधी खर्च करून केलेल्या रस्त्याचे काम पून्हा सुरू!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील मारवाडी फाटा ते रोहडा या डांबरी रस्त्याचे काम सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे. या रस्त्यावर जेसीबी मशीननेच माती मिश्रित गिट्टीचा थर आथरल्या जात असून कोणत्याही प्रकारची लेव्हल न करता त्यावर अतिशय तुरळक असे डांबर टाकून बारीक गिट्टीचा चुरा टाकण्यात येत आहे. मारवाडी फाटा ते मारवाडी गावाकडे जाणारा रस्ता अशाच दर्जाचा बनविण्यात येत असल्याने मारवाडी येथील गावकऱ्यांनी तो रस्ता बंद पाडला आहे. म्हणून त्या पुढच्या रस्ता करणे चालू आहे परंतु हाही रस्ता अतिशय निष्कृष्टपणे बनविल्या जात आहे. याबाबत मारवाडी वरोडा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथे योग्य ती चौकशी करून इस्टिमेट नुसार रस्ता बनविण्यास ठेकेदारास सांगावे अशा प्रकारचे निवेदन दिनांक 16 जानेवारी रोजी दिले आहे. रस्ता योग्य न बनविल्यास गावकऱ्यांनी शांततेत आंदोलन करावे लागेल किंवा उपोषणास बसावे लागेल असे निवेदनात नमूद केले आहे. मागील काही वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून मारवाडी फाटा ते पांडूंना केदारलिंग पर्यंतचा रस्ता बनविण्यात आला होता त्या रस्त्याबाबतही गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा तो रस्ता थातूरमातूर केल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. तोच रस्ता पुन्हा तशाच प्रकारे बनविल्या जात असून यावर संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने हा ही रस्ता थातुरमातुर बनविल्या जात आहे.माळ पठारावरील बेचाळीस गावातील रस्ते अशाच प्रकारे थातुरमातुर बनवून केवळ बिले काढण्यात येत असल्याची ओरड नागरिकांतून होत असून याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

 

आधीच निधी अभावी ठेकेदार लोक काम करत नाहीत रस्ता खराब होत असेल तर आम्ही लक्ष देऊन हा रस्ता चांगला बनवून देतो. या रस्त्याची संबंधित ठेकेदार हा चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे. 

– उमाकांत  कांबळे.  उपविभागीय अभियंता साबां उपविभाग पुसद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close