वणी विधानसभा मतदारसंघात भाकपचे कॉ.अनिल हेपट हे प्रागतिक पक्ष आघाडीचे उमेदवार

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : शेती-रास्त हमीभाव,विज,पाणी,पिक,आत्महत्या,योग्य मदत व नुकसान भरपाई,भूमी अधिकार,मनरेगा विस्तार. उद्योग, श्रमसंहीता रद्द करणे,कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा. महिला, अल्पसंख्यांक, दलित, ओबिसी, आदीवासी वरील अत्याचार. महागाई, बेरोजगारीची, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेवरिल संकटे व उपाययोजना. संविधानिक मुल्यांचे रक्षण,धर्मांध,मनुवादी फॅसीझमच्या षडयंत्रास कसुन विरोध. मागण्या घेऊन व आगामी विधानसभा निवडणुकीत जनविरोधी भाजप आघाडीचे सरकारला पराभूत करण्यासाठी मुंबई येथे १३ पक्षांची प्रागतिक आघाडी स्थापन झाली. याच अंतर्गत वणी येथील वसंत जिनींग सभागृहात दि.१३ आॅगष्ट रोजी स्थानिक प्रागतिक पक्षांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वणी विधानसभा मतदारसंघात भाकपचे कॉ.अनिल हेपट हे प्रागतिक पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील हे निश्चित झाले. या बैठकिला कॉ. गुलाबराव उमरतकर यांचे अध्यक्षतेखाली भाकप राष्ट्रीय कौंसिल सदस्य कॉ.तुकाराम भस्मे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.श्याम काळे हे उपस्थित होते. त्याच अनुषंगाने वणी येथील शेतकरी लाॅन मध्ये १५ सप्टें. २०२३ रोजी दु.१२ वाजता प्रागतिक पक्ष आघाडीची प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्रागतिक आघाडीत असलेल्या सर्व पक्षांंचे प्रमुख नेते येणार आहेत. १५ सप्टेंबर ला होणाऱ्या प्रचंड जाहीर सभेत प्रागतिक पक्ष आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पक्ष, भाकप माले, बहुजन विकास आघाडी, जनता दल सेक्युलर,श्रमिक मुक्ती दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लीकन पार्टी आॅफ ईंडीया सेक्युलर हे पक्ष सहभागी होणार आहेत.



