ईतर

सि.ए.च्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवणाऱ्या इजणी येथील कु. रितिका खंडेलवाल हिचा हिवरा किराणा असोसिएशन तर्फे सत्कार!

महागाव/प्रतिनिधी : अंगी जिध्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असला तर खेडे गावातील मुली सुध्दा, शैक्षिणीक क्षेत्रांत अथक परिश्रम करत यशाला गवसणी घालत, भरारी घेत सनदी लेखपाल” सी.ए.च्या परिक्षेत नेत्र दिपक यश प्राप्त करुन ईजनी गावचे नाव देश पातळीवर झळकविले आहे.

महागाव तालुक्यातील ईजनी येथिल कु.रितिका राजेन्द्र खंडेलवाल या विद्यार्थीनीने शिक्षण क्षेत्रात अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सी. ए.च्या परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. महाविदयालयीन शिक्षण पुसद येथिल श्रीमती वत्सलाबाई नाईक या महाविद्यालयात या विद्यार्थीनीने घेतले होते. रितिकाचे वडिल किराणा उद्योजक असुन आई सौ. रेखाताई गृहिणी आहे. आई वडिलाची जाण असलेल्या रितिकाने अथक परिश्रम करुन दैदिप्यमान यश संपादन करुन ईतर मुली- मुला समोर आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे सर्व स्तरातुन रितिकाचे अभिनंदन होत आहे याच अनुषंगाने आज बुधवार दि.१९ जुलै २०२३ला हिवरा संगम येथील हिवरा किराणा व्यापारी असोसिएशन तर्फे कु.रितिकाचा तिच्या घरी जाऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच रितिकाचे वडील राजेंद्र खंडेलवाल व आई सौ. रेखाताई खंडेलवाल, किराणा असोसिएशनचे उपाध्यक्ष व कु.रितिकाचे काका ओमशेठ खंडेलवाल व काकू मंजू खंडेलवाल यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी कृषी खंडेलवाल, हिवरा किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विजयराव बोंपीलवार , सचिव अभय बोंपीलवार, संजय बोंपीलवार, भगवानराव बोंपीलवार, अनिल बोंपीलवार, चंद्रशेखर कदम, रवीं कदम,संतोष सोनवणे, रमेश ठाकरे, कृष्णा आंडगे, पत्रकार तथा राज्य ग्रंथालय महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close