श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात रा. से.यो.स्थापना दिवस साजरा ;नाचणार्यापेक्षा वाचणारी पीढी तयार करणे युवकांची जबाबदारी -पंकज पाल महाराज

पुसद:स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त सप्तखंजरी वादक तथा समाजप्रबोधनकार पंकज पाल महाराज यांनी व्यक्तीमत्व व नेतृत्व गुण विकास उद्बोधन कार्यक्रमात युवकाला उद्देशून वरील मार्मिक उद्गार काढले.
आजच्या काळात सण उत्सव, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्क्रमात युवक डी. जे.च्या तालावर बेधुंद होऊन नाचतांना दिसतात परंतू देवदेवतांना व महापुषांना हे कधीच अपेक्षित नव्हते. फॅशन च्या नावाखाली वेगवेगळी स्टाईल मारण्यापेक्षा युवकांनी फुले,शाहू,आंबेडकर या महामानवाची स्टाईल करून जीवनाचा विकास घडवून आणावा यासाठी आजच्या काळात नाचणार्यापेक्षा वाचणारी सुजाण पीढी तयार करण्याची जबाबदारी युवकांची आहे.
असे परखड मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य विजय उंचेकर,प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.पंकज पाल महाराज तर प्रमुख अतीथी म्हणून पर्यवेक्षक आर. व्हि हिरवे, रा. से.यो.जिल्हा समन्वयक प्रा.गजानन जाधव, प्रा. एन. टी राठोड विचारपीठावर उपस्थितीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ,राष्ट्रसंत गाडगे महाराज, लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागतानंतर व पुनम जाधव, काजल जाधव यांच्या स्वागत गीताने व तनया गडदे, अनुराधा लोखंडे यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक भाषणात जिल्हा समन्वयक प्रा.गजानन जाधव यांनी रा से यो स्थापने मागील भूमिका विशद केली. आपल्या उद्बोधन कार्यक्रमात पंकज पाल महाराज पुढे म्हणाले की,शिक्षणातून मिळणारे सर्वांग सुंदर संस्कार प्राप्त करा, आई वडील, शिक्षक यांचा सन्मान करा. चारित्र्य संपन्न मित्र जोडा. परोपकारी बना एक बाॅटल रक्त दान केल्याने ईश्वर भेटल्याची अनुभूती येईल. प्राचार्य विजय उंचेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना हि चारित्र्य संपन्न, संस्कारी युवक घडविणारी कार्यशाळा आहे ह्या संधीचे आपन सोने करावे असे आवाहन केले. दर्जेदार कार्क्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकाचे कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मनाली गायकवाड तर श्रावणी कुबडे हिने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब देशमुख, प्रा.अर्चना पाल, योगिता कास्टे प्रा. निलेश जाधव,प्रा आशिफ शेख, प्रा. मोनिका मंदाडे ओम राठोड, कुणाल पिंगळे, ऋतीक मंदाडे, गोविंद हाके, करण मस्के शाम रणखांब, पूजा साखरे, आचल कांबळे, रोषनी बनसोडे,श्रृती खराटे, पूनम दांडेगावकर यांनी पुढाकार घेतला. या वेळी सर्व विद्यार्थ्यांसह, शेजारच्या वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पुसद राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एल राठोड, प्रा आर के डेकाटे ह्यांनी उद्बोधन कार्यक्रमाचा लाभ घेतला.