लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रात करावा ; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी!

पुसद: महाराष्ट्रात हिंदू मुलींची फसवणूक करून, त्यांना प्रलोभनं देऊन बळजबरीने त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास म्हणजेच त्यांचे धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडलं जातं बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने धर्मांतर प्रतिबंध कायदा आणावा लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा ‘ करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. उपस्थित शिष्ट मंडळाला दिले. ते ‘ लव्ह जिहाद, धर्मांतरण ‘च्या विरोधात महाराष्ट्रभरात काढण्यात आलेल्या विविध मोर्चाच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री व यवतमाळ चे पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आ.भरत गोगावले आणि आ. प्रताप सरनाईक, यांनी आश्वासन दिले हिंदू संघटनांच्या वतीने शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु विधीज्ञ परिषद, सनात सनातन अभियान संस्था, संकल्प हिंदु राष्ट्र मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषीक बाह्मण महासंघ, ‘चित्पावन ब्राह्मण महासंघ’ आदी संघटनांतर्फ अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे, सौ. स्नेहल जोशी, सुनील घनवट, रवि ग्यानचंदनी, शंकर देशमुख, पराग फडणीस, कमलेश कटारिया नितीन वाटकर, धनंजय गायकवाड , कैलास देशमुख, सागर देशमुख, आशिष सुंठवाल, गौरव बैताडे,उमाकांतजी रानडे, राहुल पांडे, श्रीकांत पिसोळकर, अभिजीत पोलके आणि करण थोटे यांचा समावेश होता. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी महाराष्ट्रभर ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरण ‘च्या विरोधात लाखोंच्या संख्येने ५० हून अधिक मोर्चे निघाले होते त्यावर वर्षभरापुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात लवकरात लवकर ‘ लव्ह जिहाद आणि धर्मांतरण ’ च्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, मात्र आता एक वर्ष उलटून गेले असूनही अद्याप तरी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा झालेला नाही.देशातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी ‘ लव्ह जिहाद ’ च्या विरोधात कायदा केला आहे. महाराष्ट्रातही लवकर कायदा त्वरित व्हावा, तसेच २०१४ साली माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गोहत्याबंदी चा कायदा अम्लात आणला होता परंतु आजही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसून काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अभयामुळे या कायद्याची पायमल्ली होत आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने मा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना करण्यात आली.यावर शासनाची भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की, सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे तुम्हाला माहिती आहे . त्यामुळे लव्ह जिहाद आणि धर्मांतरण संदर्भात राज्य सरकारने एक-एक करून निर्णय घ्यायला प्रारंभ केला आहे. शासनाची भूमिका काय आहे, हे आम्ही प्रतापगडावरील कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शासन तुमच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. कायद्याविषयी शासनाने काय केले, यासाठी लवकरच मुंबईला आपल्यापैकी ठराविक लोकांची बैठक ठेवून त्याबाबत चर्चा करण्यात येईल आणि गोहत्याबंदी कायद्याची ची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन दिले असल्याची माहिती रवि ग्यांचदानी यांनी झेप न्यूज शी बोलतांना दिली आहे.