काळी येते खाजगी लाईनमेनचा विद्युतचा शॉक लागून मृत्यु झालेल्या प्रकरणाच्या दिवशी निर्दोष व्यक्तीवर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गून्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा!

पुसद: काळी (दौ.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
विद्युत वितरण कंपनी काळी (दौ.) येथे कंत्राटी पद्धतीने आऊट सोर्सिंग या पदावर ड्युटीवर असतांना विठ्ठल सिताराम आढाव याचा शॉक लागून दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मृत्यु झाला. त्यामध्ये दोषी ऑपरेटर राहुल राऊत व कनिष्ट अभियंता निलेश काकडे याच्यावर अपराध क्र. ८४९/२०२३ अनुसार भा.द.वि. चे कलम ३०४ ए व ३४ नुसार गुन्हे दाखल झाले आरोपीच्या अटकेसाठी व मृतकाचे कुटुंबियांना नोकरी द्या व तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्या, पुसद ग्रामीण चे ठाणेदार राठोड आरोपी निलेश काकडे यांची बाजु घेत असल्याने तपास ईतर पोलीस स्टेशन कडे देण्याची मागणीC घेऊन १७ नोव्हेंबर२०२३ रोजी बिरसा ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आंदोलन छेडण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महावितरण च्या वतीने ४ लाखाचा मृतकाचे कुटूंबाला धनादेश देण्यात आला व मृतकाचे पत्नीस पेंशन लागू करण्याबाबतचे मागणी मान्य करण्यात आली व आरोपी निलेश काकडे यास अटक करण्यात आली होती.सदर घटनेनंतर आरोपी निलेश काकडे याने २६ नोव्हेंबर२०२३ रोजी पुसद ग्रामीण पोलीसांच्या संगनमताने काळी (दौ.) येथील निर्दोष व्यक्तींविरुद्ध अपराध क्र. ८६४ / २०२३ भा.द.वि. चे कलम ३५३,३३२, ५०४, ३४ अनुसार गुन्हे दाखल केले आहे. अधिकाऱ्यांसोबत शासकिय कामात अडथळा निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यास ताबडतोब पोलीसांकडे तक्रार देणे गरजेचे होते. परंतु तशी कोणतीही घटना झाली नसतांना निर्दोष व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून शॉक लागून मृत्यु झालेल्या घटनेतील मृतकाचे नातेवाईक व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी सदरचा गुन्हा दाखल केला आहे तो खोटा गुन्हा खारीज करुन न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड व काळी येथील नागरिकांच्या वतीने आज देण्यात आले.या निवेदनामध्ये पोलीस अधिकार पदाचा गैरवापर करुन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीणचे ठाणेदार राठोड हे आरोपी निलेश काकडे यांना सहकार्य करीत आहेत त्यामुळे त्यांच्या पोलीस स्टेशन कडून काळी येथील घटनेचा तपास काढून इतर पोलीस स्टेशनकडे देण्यात यावा अशीही मागणी करीत सदर मागण्यांची दखल ७ दिवासचें आत न झाल्यास नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडावे लागेल. जेलभरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा सुद्धा आपल्या निवेदनातून बिरसा ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांच्यासह सखाराम इंगळे, अतिष वाघमारे, अक्षय व्यवहारे, पंकज वंजारे, अमोल हगवणे, शंकर पठाडे, हंसराज मोरे, संतोष झिंगरे, अनिल आढाव, रवींद्र पठाडे, दत्ता बेले, देवानंद आंबोरे, मो.शरीफ अ. वहाब शेख वशीम, संतोष आढाव, गजानन वाघमारे, विशाल चव्हाण, अमोल डोईफोडे, विशाल राठोड, प्रदीप चव्हाण, आशिष बोके, समाधान बेले, शरद काळे, उकांडा राठोड, श्रीनिवास जाधव,लक्ष्मण राठोड,किरण जटाळे,विठ्ठल मिरासे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.