भारती मैंद पतसंस्थेला सहकार्यासाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी सरसावली;ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य!

पुसद : येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थे बद्धल काही चुकीच्या माहिती च्या आधारे संभ्रम निर्माण होऊन अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढणे सुरु केले होते. या बाबत संचालक मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करून ठेवीदारांना समजविण्याचा प्रयत्न केला त्यात काही प्रमाणात यश देखील आले. मात्र दैनंदिन कामासाठी उपयोगी पडणारी लिक्विडीटी कमी झाल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती. या संकटावर मात करण्यासाठी भारती मैंद पतसंस्था संचालक मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने बुलढाणा अर्बन कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष राधेशाम जी चांडक उर्फ भाईजी यांची बुलढाणा येथे जाऊन तातडीने भेट घेत सर्व परिस्थिती ची माहिती दिली असता चांडक यांनी सर्व परिस्थिती समजून घेत संस्थेला सर्व तो परी मदत करण्याचे प्रसंगी विलिनीकरणं करण्यासाठी देखील तयारी दर्शवून सकारात्मक प्रतिसाद दिला. वरील संदर्भात भारती मैंद च्या संचालक मंडळाची बैठक होऊन संचालक मंडळाने राधेशाम जी चांडक यांच्या सकारात्मक प्रतिसादा बद्धल कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी सुचविलेल्या विलिनीकरणाच्या पर्यायावर देखील चर्चा करून तसा प्रस्ताव देण्याचे ठरले. बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी च्या भक्कम पाठिंबा पाहता ठेवीदारांनी भीती बाळगू नये, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याने काढण्याची घाई करू नये असे पुन्हा अवाहन भारती मैंद पतसंस्था संचालक मंडळातर्फे अध्यक्ष ॲड .अप्पाराव मैंद, उपाध्यक्ष ॲड .भारत जाधव यांनी झेप न्यूजला दिले आहे.