ईतर

पुसद तालुक्यातील मांडवा येथील बुद्धविहारास भंतेजींनी नुकतीच सदिच्छा भेट!

पुसद : तालुक्यातील मांडवा येथील सम्यक संबोधी बुद्धविहारास कुशीनगर येथील तसेच छत्रपती संभाजीनगर, दाभड(नांदेड) आणि मुळावा येथील सहा पु.भंतेजींनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.भारतीय बौध्द ज्ञानलंकार शिक्षण सस्था तसेच धम्मदुत बुध्दाविहार मुळावाचे संस्थापक अध्यक्ष पु. भंतेजी धम्मसेवकजी महाथेरो मुळावा गृहस्थ जीवनातील प्रल्हाद ढोले यांची जन्मभूमी असलेल्या पुसद तालुक्यातील मांडवा येथे चौथ्या वर्गात असताना दगडावर कोरीव प्रतिज्ञा केली होती की, मी भन्ते बनणार तो दगड आजही साक्ष देत आहे. प्रतिज्ञा शिलालेखास तसेच सम्यक संबोधी बुद्धविहारास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास पू. भंतेजी एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजीनगर, पू. भंतेजी डॉक्टर इंदवस महाथेरो कुशीनगर,भंतेजी नागसेन,भंतजी अनिरुध्द थेरो,भंतेजी सुमेधबोधी, भंतेजी पट्टीसेन आदी भन्तेजी यांनी भेट देऊन शुभ आशीर्वाद दिला.

यावेळी पु. भंतेजी डॉ.एम. सत्यपाल महाथेरो स्वलिखित पु. भंतेजी धम्मसेवकजी महाथेरो जीवनचरित्र पुस्तक संच डॉ. बाबासाहेब आबेडकर सार्वजनिक वाचनालयास भेट देऊन बुध्दविहार आणि वाचनालयाची सुव्यास्थपन पाहुन समितीचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close