भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांच्या आडून मुस्लिमाना टार्गेट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत- डॉ.मोहम्मद नदिम!

पुसद:भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार पुसद दौऱ्यावर येवून विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत गुन्हे दाखल करावे यासाठी शहर पोलीस ठाण्यात येत आहेत. परंतु किरीट सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांच्या आडून आधिच संवेदनशील असलेल्या पुसद शहरातील सामाजिक सलोखा बिघडवत असून समाजात द्वेष पसरवत आहेत.व जाणूनबुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करीत आहेत त्यामुळे किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागण्या मान्य न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच यापुढे शहरात येऊन वातावरण खराब केल्यास त्याचा प्रतिकार करण्यात येईल व त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास किरीट सोमय्या व संबंधित प्रशासन जबाबदार राहील अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी डी एन ग्रुप हॉलमध्ये१२:०० वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांच्या आडून मुस्लिमाना टारगेट करून पुसद शहरांतील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. काही दिवसापासून पुसद शहरात बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असून अशा नागरिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात आले होते सोमय्या यांनी पुसधमध्ये येताना काही पुरावे सोबत आणले. पुसद शहरातील बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म दाखले देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दोषी नागरिकांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. परंतु किरीट सोमय्या यांनी बंगलादेशी घुसखोरांना जरुर शोधून काढावे पण जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये त्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या शहराचे सामाजिक सलोखा बिघडत आहे.अशी महीती डॉ. मोहम्मद नदीम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी तसेच विधार्थाना महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड,सारखी कागद पत्रे लागतात आणि ही कागद पत्रे तयार करण्यासाठी जन्म नोंद प्रमान पत्राची आवश्यकता असते. ज्यांची नोंद नाही त्यांना आप आपल्या नोंदी करण्याकरिता २७ एप्रिल २०२६ ही शासनाने शेवटची तारीख ठरवली आहे म्हणून ज्यांची जन्मनोद नाही ती मंडळी जन्मनोंदी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.नगर परिषद किवा ग्रामपंचायत येथून जन्मनोंदी नसल्याचा दाखला घेऊन त्यासोबत आवश्यक कागद पत्रे सादर करून सबंधित कार्यालयातून त्याबाबतची चौकशी केली जाते परंतु वर्ष भरापूर्वी पासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहंगीया नागरिकांचे भारतात शिरकाव झाला आहे अशे सांगून बंगलादेशी नागरिक शोधाच्या मुद्द्यावरून सम्पूर्ण महाराष्ट्रमध्ये मुस्लिम समाजाला लक्ष करण्याचा काम केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमय्या दोन वेळा पुसद शहरात येऊन गेले मात्र कुठल्याही मुद्याबाबत प्रशासना कडे तक्रार करण्याचा किवा चुकीच्या घटना बद्दल प्रशासनाला अवगत करण्याचा प्रत्येक नागरिकला अधिकार आहे परंतु किरीट सोमय्या या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत केंद्रात आणि राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे याचा फायदा घेऊन तक्रार इत्यादी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन अधिकाऱ्यावर दबाव टाकणे दमदाटी करून चुकीच्या कारवाया करण्याबद्दल निर्देश देत आहे. बैठकीत प्रशासकीय अडचण समझून घेण्यापेक्षा अधिकाऱ्यांना मी सांगतो त्या पद्धतीने काम करा असे निर्देश ते देत आहे ही बाब सहन करण्यासारखी नाही.जन्मनोंदी हा विषय कोण्या एका समाजापूरता मर्यादीत नाही त्यांच्या या विनाकारणच्या कृतीमुळे सर्व सामान्य नागरिक वेठीस धरल्या जात आहे त्यांच्या हे उपद्रव आणि भ्रामक वक्त्याव्यामुळे शासनाने दि.१२ मार्च २०२५ रोजी जन्मनोद करण्याकरिता दिशा निर्देश देण्यासाठी शासनाने अध्यदेश काढला आहे त्यात जन्मनोंदी नसल्याचा दाखला मिळविण्याकरिता सुद्धा १३ कागद पतत्रांची यादी प्रकाशित केली आहे. ही अट त्रास दायक आहे सर्व सामान्य नागरिकांना वरील कागदपत्रे तयार करणे सोपे नाही म्हणून शासनाने सदर अद्यादेश रद्द करावा व सामान्य नागरिकांना सोप्या सोईस्कर अशा अटी घालून दुसरा अद्यादेश काढावा तसेच किरीट सोमय्या वर्षभरा पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून फेक प्रकरणे सादर करीत आहेत त्यांच्या या मोहिमेत आज पर्यन्त एकही बांगलादेशी सापडला नाही फक्त त्यांच्या भ्रामक वक्तव्यामुळे सामाजिक तनाव निर्माण होत आहे. जन्मनोंदीचा प्रश्न सर्व समाजाचा आहे परंतु मुस्लिमांना टार्गेट करून किरीट सोमय्या जे वक्तव्य देत आहे त्यामुळे सामाजिक तणावं निर्माण होत आहे. पुसद शहरात मागील काळात एक दोन अनुचित प्रकार घडले २००९ साली जातीय दंगल सुद्धा झालेली होती त्यामुळे पुसद शहराची अतीसंवेदनशील शहर म्हणून नोंद झालेली आहे पुसद शहराचा सामाजिक एकोपा व सदभावना कायम राहावा जातीय दृष्टीने संवेदनशील शहर म्हणून असलेली नोंद संपवावी या साठी शहरातील हिंदू मुस्लिम जावबदार नागरिकांनी प्रयत्न केलेले आहे आणि आज रोजी पुसद शहरात सदभावना प्रेम सामाजिक एकोपा आहे या सामाजिक एकोप्याला तडा देण्याचा काम किरीट सोमय्या करीत आहे. मागील आढवड्यात किरीट सोमय्या पुसद ला येऊन विनाकारण बडबड करून गेलेले आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि त्याचा प्रतिकार करावा अशी जनभावना निर्माण झाली होती परंतु सामाजिक सलोखा बिघडू नये या साठी जबाबदार व्यक्तींनी पुढकार घेऊन थांबवले होते किरीट सोमय्या यांना कही चुकीचे वाटत असेल तर त्यांनी त्यांच्याच सरकारकडे मुखमंत्री, मुख्य सचिव यांच्या कडे पूर्वी सदर केलेल्या प्रमाने ट्रक भरून तक्रारी व पुरावे सादर करावे. ते योग्य ती कार्यवाही करतील विना कारण शहरा शहरात फीरून राज्यातला जातीय सलोखा खराब करू नये विशेषत पुसद शहरातील हिंदू मुस्लिम जवाबदार नागरिकांनी, नेत्यांनी आणि पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न पूर्वक सदभावना व सामाजिक एकोपा कायम ठेवला आहे आणि संवेदनशील शहराच्या यादीमधून पुसद शहराचे नाव वगळल्या जातील अशे काम केलेले आहे अशा वेळी किरीट सोमय्या यांना कोणते ही संवेधानिक पद नसताना त्यांनी शासकीय यंत्रनेत हस्तक्षेप करण्याचा तसेच या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश देण्याचा व दमदाटी करण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.किरीट सोमय्या शहरात येऊन वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे ते खपवल्या जाणार नाही किरीट सोमय्या पुन्हा पुसद शहरात आलेतर त्यांचा लोकशाही प्रतिकार होईल त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्या साठी किरीट सोमय्या आणि संबंधित प्रशासन जवाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. सदर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम शहर काँग्रेस अध्यक्ष झिया शेख, सामाजिक कार्यकर्ते मसूद मिर्झा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष तहेसीन खान, काँग्रेस जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष सय्यद जाणी, अल्प. शहर अध्यक्ष जब्बार लाखे अदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.



