ईतर

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पुसदमध्ये बिरसा ब्रिगेड रस्त्यावर!

पुसद:देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहे. मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.घडलेली घटना तर लोकशाहीसाठी कलंक ठरली. तरीही केंद्र सरकार जागे होत नाही, केंद्र सरकारने मनिपुर प्रश्न योग्यरित्या न हाताळल्याने हे राज्य पेटले असून महिलाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. या प्रकरणी केंद्र सरकार विरुद्ध सर्वसामान्य जनतेत व आदिवासी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या घटनेच्या निषेधार्थ आज पुसदमध्ये बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला असून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतीना निवेदन पाठवण्यात आले असून मणिपूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी मणिपूरमधील दोन कुकी आदिवासी समाजातील महिलांना निर्वस्त्र करुन त्यांना रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचेवर लैंगीक अत्याचार करण्यात आले. ही घटना एका व्हिडीओ क्लीपद्वारे उघडकीस आलेली आदिवासी स्त्रीयांची नग्न धिंड आणि त्यांची शारीरीक विटंबनेची क्रूर व अमानुष घटना मानवतेला कलंक आहे. तर दुसऱ्या घटनेत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मध्यप्रदेशमधून समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडिओमध्ये एका आदिवासी गरीब तरुणाच्या चेहऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या एका कार्यकर्त्याची खुलेआम लघवी करत असल्याचे दिसत आहे ही बाब इतकी घृणास्पद आहे या दोन्हीही घटनांचा भव्य मोर्चा काढून निषेध करण्यात आला आहे.

मणिपूर व मध्यप्रदेश या राज्यात डबल इंजिन भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. आदिवासींच्या कल्याणाचे दावे करणाऱ्या भाजपचा एक नेता आदिवासी ग़रीब व्यक्तिच्या अंगावर लघुशंका करत आहे. ही घटना निंदनीय आहे.भाजपाचे हेच कां? तुमचे आदिवासी प्रेम?? या जंगलराजला काय म्हणाल व या भाजपा नेत्याला अटक का नाही?”त्यामुळे केंद्र सरकारचाही निषेध करण्यात आला आहे. अशा असभ्य कृतीचा निर्लज्ज राज्य व केंद्र सरकारने दखल न घेणे म्हणजे त्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे मणिपूर सरकारने आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य चूक केली आहे. अशा नपुसक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यामुळे मणिपूरच्या या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून आदिवासीच नव्हे तर देशातील कोणत्याही जाती धर्माच्या स्त्रियांवर अन्याय होत असेल तर हे संपूर्ण देशातील जनतेसाठी लाजरवानी बाब आहे.
या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या बेजबाबदारपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतय. कारण जून महिन्यात FIR दाखल झाल्यानंतर काही कारवाई झाली नाही अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही”या घटनेचा निषेध व्यक्त करीत बिरसा ब्रिगेडच्या वतीने देशाच महामहीम राष्ट्रपतीना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.या प्रकरणात सखोल चौकशी करून सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई करुन मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा पुन्हा अशा प्रकारच्या घटनांवर आवर घालण्यासाठी विकृत मानसिकतेच्या नराधमांना व राज्य तसेच केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा बिरसा ब्रिगेडच्या मोर्चेक-यांनी दिला आहे.या मोर्चात सहभागी झालेले बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारीती भस्मे, तालुका अध्यक्ष सुनिता मळघने, व सल्लागार सुरेश धनवे यांच्या नेतृत्वात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकातून निघालेला मोर्चा, महिला के सन्मान मे बिरसा ब्रिगेड मैदान मे अशा घोषणा देत आणि मनिपुर आणि केंद्रातील भाजप सरकारच्यानिषेधाच्या घोषणा देत निघालेल्या आजच्या मोर्चामध्ये महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यामध्ये मनीषा बेले, शिल्पा सरकुंडे,, उषा टारफे, कुसुम मारकड, मिनाक्षी व्यवहारे, शोभा कांबळे, सविता धनवे, शांताबाई बेले, नंदा उघडे, छाया बळी सविता इंगोले महानंदा वंजारे मीरा नांदे पुष्पा वंजारे संगीता कुरकुटे मथुरा धुमारे पार्वती आसवले संगीता काळे सुभद्रा कराळे अजय धंगारे, नाना बेले अर्जुन हगवणे, किशोर कांबळे, गजानन उघडे, साकिब शहा, युवराज भांगे, रामदास भडांगे, शरद ढेंबरे नारायण कराळे, दुर्गादास ढाकरे वसंता चिरमाडे, गणपत गव्हाळे, संजय डुकरे दत्ता खंदारे युवराज भांगे बालाजी बेले गणेश भुजाडे गजानन टाले सखाराम इंगळे गजानन भोगे रामकृष्ण चौधरी वसंत चिरमाडे अजगर शेख राजू पेदेवाड, श्याम देवकुळे विनोद राठोड पारेश्वर दळवे अनिल खंदारे विठ्ठल मिरासे शिवाजी मारकड रामकृष्ण धनस्कर सुखदेव तुम्हारे प्रकाश भोसले ज्ञानेश्वर मेटकर इंगोले, माधवराव वैद्य गणपत काळे, ॲड आरिफ अहेमद, अनंत माळकर, हरिदास बोके बबलू काजी बापूराव कोतेआदींसह शेकडों
महिला पुरुष पदाधिकाऱी सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close