सामाजिक

पुसद शहरातील दुर्गा मंडळांसाठी भारती मैंद पतसंस्थेच्या वतीने भव्य स्पर्धेचे आयोजन;१लाख ४१हजार रु.चे रोख बक्षीस! 

पुसद : शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दुर्गा मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुसद शहर व लगत च्या उत्कृष्ट दुर्गा मंडळांना विविध ३श्रेणी मध्ये प्रत्येकी ३असे एकूण ४१ हजार रु.ची रोख बक्षीस,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.पर्यावरणपुरक नवरात्रौत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मातीची मूर्ती तसेच पुजासाहित्य व ईतर सजावट साहित्य ही पर्यावरणपुरक असणाऱ्या मंडळांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.उत्कृष्ट मूर्ती, १० दिवसात राबविलेले उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम व उत्कृष्ट सजावट या ३श्रेणी साठी स्पर्धा आयोजित केली आहे.प्रत्येक श्रेणीत २१ हजार रु प्रथम ,१५हजार रु द्वितीय व ११हजार रु तृतीय असे१लाख ४१हजार रु चे रोख एकूण ९बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र तसेच सहभागी सर्व मंडळांना प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे.निवड समितीतील सदस्य शहरातील दुर्गा मंडळाला भेटी देऊन सर्व माहिती घेतील.तसेच मातेच्या मूर्तिचे फोटो व व्हिडीओ शूटिंग काढले जाणार आहे. वरील स्पर्धा प्रकारामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या दुर्गा मंडळानी आपली नावे १७ऑक्टोबर २०२३ सायंकाळी सकाळी ११ते सायंकाळी ५ या वेळेत भारती मैंद नागरी सह पतसंस्था मुख्य शाखा जगदंबा अपार्टमेंट मोतीनगर पुसद येथे नोंदवून घ्यावे लागणार आहे. निवड समिती प्रमुख ललित सेता, सदस्य प्रा. दिनकर गुल्हाने, गजानन मोगरे सर , कौस्तुभ धुमाळे,स्वप्नील चिंतामणी, , निलेश राजुलवार यांची टीम स्पर्धेच्या परीक्षण हेतूने मंडळांना भेट देण्यासाठी येत असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष एड. आप्पाराव मैंद, सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष एड भारत जाधव, सर्व संचालक मंडळ तथा सामाजिक उपक्रम समिती सदस्यांनी केले आहे.

गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण १३ऑक्टोबर ला गणेशोत्सव निमित्त भारती मैंद पतसंस्थे तर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणचा कार्यक्रम १३ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:००वाजता पुसद अर्बन कॉ ऑप बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पंकज अतुलकर, नप चे मुख्याधिकारी अभिजित वायकोस,शहर पो स्टे ठाणेदार उमेश बेसरकर, वसंत नगर पो स्टेचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close