शहीद रामराव सोडगिर स्मारकांच्या जागेवरून भुमी पुजन सुरू असताना संतप्त जमावाचा हल्ला!
खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल १६ जणांना अटक फरार आरोपीचा शोध सुरू!

पुसद: तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळ पठारावरील बेलोरा येथील शहीद रामराव सोडगिर स्मारकांच्या जागेवरून भुमी पुजन सुरू असताना संतप्त जमावाचा हल्ला केला दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील १८जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि.२३ ऑक्टोंबर २०२४रोज बुधवार सकाळच्या८:००ते९:०० वाजण्याच्या सुमारास दोन समााजाच्या गटात जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकावर दगडफेक करून तुफान हाणामारी घडली. याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून दोन्ही गटातील १६ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची पोलीस सुत्रांची माहिती आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळ पठारावरील बेलोरा येथे दि.२३ ऑक्टोंबर २०२४रोज बुधवार सकाळच्या८:००ते९:०० वाजण्याच्या सुमारास शहीद रामराव सोडगीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सुरू असतांना दोन समााजाच्या गटात जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकावर दगडफेक करून तुफान हाणामारी घडली शहीद रामराव सोडगीर यांचे बॅनर
फाडून पुजेचे सामान फेकुन दिले. सोडगीर यांच्या फोटोफ्रेमीची विटंबना करुन वीरपत्नी वैशाली रामराव सोडगीर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला व शहीद रामराव सोडगीर यांचा मुलगा अभिषेक सोडगीर व प्रफुल तुकाराम मारकड हे वाचविण्याकरीता गेले असता त्यांच्यावर लोखंडी रॉड, दगड काठी डोक्यावर टाकुन जखमी केले.
गंभीर जखमिंना उपचारासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले. असून या प्रकरणाचा अधिक तपास अप्परपोलीस अधीक्षक जगताप ,उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पाटिल हे तात्काळ पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही समाजाच्या लोकांना शांततेचे आव्हान करण्यात आले.याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आली असून यामध्ये दोन्ही गटातील १८जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गटातील१६ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत आता बेलोरा गावात तणाव पूर्ण शांतता असल्याची पोलीस सुत्रांची माहिती आहे.



