घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर ! बांधकामासाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार;महागाव येथे मोफत रेती योजनेचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम): जनसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये रेती उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे रेती माफियांचा काळाबाजार बंद करण्यासाठी राज्य शासनाने रेती धोरण आखले होते.तसेच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, व इतर आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची रेती कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा शासनाने केली होती या योजनेचा नुक्ताच शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला असुन लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.पंतप्रधान घरकुलव इतर आवस योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी शासनाच्या वतीने ५ब्रास रेती मोफत देण्यात येणार असुन या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते महागाव तालुक्यातील भोसा येथे करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळपांडे, तहसीलदार विशंभर राणे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, मंडळ अधिकारी सरपंच जयश्री चव्हाण,तलाठी एम. एम. शेख, तुषार आत्राम, धुळे, पोलीस पाटील जगताप, महसुल कर्मचारी जीवन जाधव . अमोल जामकर, राजु सुरोशे, गजानन डाखोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजना व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या मागणी नुसार तालुकानिहाय रेती घाट राखीव ठेवण्यात आले असुन जिल्ह्यातील २२वाळु घाटांना पर्यावरण मंजुरी प्राप्त झाली असुन त्यापैकी ९रेती घाट शासन तरतुदीनुसार घरकुल लाभार्थ्यासाठी राखीव ठेवण्यात आले असुन यामधुन प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला ५ब्रास रेती मोफत देण्यात येणार असुन लाभार्थ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.