एनडीपीएस कायद्यातील फरार आरोपीला मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकून अटक : पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारला रोडवरील एका कोचिंग क्लास मध्ये काही महिन्यापासून शिकविनी घेत असलेल्या शिक्षकास मुंबई येथील काळा चौकी पोलीस स्टेशन येथे सन २०१९ मध्ये एनडीपीएस कायद्या१९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हा आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू असताना गुप्त माहितीवरून हा आरोपी पुसद येथे असल्याची माहिती मिळाल्याने अखेर पाच वर्षानंतर या आरोपीस काल बुधवार दि, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील विक्रोळी एटीएस युनिटच्या पथकाने एनडीपीएस कायद्यातील फरार आरोपीला अटक केली.
याबाबत पोलीस सूचना दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारला रोडवरील एका कोचिंग क्लास मध्ये काही महिन्यापासून शिकवनी घेत असलेल्या शिक्षक करणसिंग दुरलासिंग जस्सोल रा.जगतपुर,जि.जयपुर, राज्य राजस्थान याचेवर सुमारे पाच वर्षांपूर्वी मुंबई येथील काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये मध्येअप.क्रं. १९/२०२१ क८(क) २२ (ब)एनडीपीएस कायद्या १९८५ अंतर्गत २४ सप्टेंबर २०१९ रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हा आरोपी आपली ओळख लपवत पोलिसापासून पळत होता. परंतु हा आरोपी चांगला सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी पुसद येथील कारला रोडवरील एका कोचिंग क्लास मध्ये मागील सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना शिकवत होता. परंतु एनडीपीएस कायदा खालील हा आरोपी फरार असल्याने त्याचा शोध पोलिसांकडून व एटीएस पथकाकडून सुरू असताना गुप्त माहितीवरून हा आरोपी पुसद येथे असल्याची माहिती मिळाल्याने अखेर पाच वर्षानंतर या आरोपीस काल बुधवार दि, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील विक्रोळी एटीएस युनिटच्या पथकांचे एपिआय पंकज भोपळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पुसद शहर पोलीस यांच्या सहकार्याने कारला रोड वरील एका कोचिंग क्लास मध्ये जाऊन एनडीपीएस कायद्यातील फरार असलेल्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या व त्याला शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. परंतु मुंबई येथील पथकाने दहशतवादी पकडल्या गेल्याची अनेकांणी अफवा पसरवल्या होत्या मात्र शेवटी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती काय..? आहे ही माहिती दिल्यानंतर शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु अफवा पसरण्याच्या पहिले कोणत्याही नागरिकांनी त्या प्रकरणाची शहानिशा व सत्यता पडताळूनच माहिती दुसऱ्याला कळवावी जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरणार नाही याची भान राखण्याची आजच्या काळाची गरज आहे. तसेच कोचिंग क्लासेस व शैक्षणिक संस्था यांनी एखाद्या शिक्षकाची नियुक्ती करताना त्यांचा पोलीस विभागाकडून चरित्र पडताळणी अहवाल सुद्धा पाहण्याची गरज आहे. याचे या शैक्षणिक संचालकांनी भान ठेवले पाहिजेत.



