अपघात:चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला घरात एका शाळाकरी विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू!

पुसद: तालुक्यातील आमदरी घाट गावात आज एक दुर्दैवी आपघात घडला एक सिमेंटची मालवाहतूक ट्रक वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या आमदरी गावातील एका घरात व शाळेच्या संडास बाथरुमला जबर ट्रकने धडक दिल्याने शाळेच्या सौचालयात एका शाळकरी विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची विदारक घटना १५ जुलै रोजी दुर्दैवी घटना घडलीआहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,आज सकाळी १५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ते ११.३० च्या सुमारास पुसद वरून नांदेड कडे सिमेंट वाहुन नेणाऱ्या सिमेंट ट्रक क्रमांक एम एच १०/सी आर ७७ ११ ट्रकच्या चालकांचा भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक आमदरी गावातील रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला नंतर शाळेच्या शौचालय व बाथरूमला जबर धडक दिल्याने शौचालयात आसलेल्या शाळकरी विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला.या अपघातामध्ये शाळेचा संडास आणि बाथरूम पूर्णतः नुकसानग्रस्त झाले आहे. सायंकाळी मुलीचे आई वडील शेतातून घरी परत आले असता शाळेतून मुलगी कां.? आली नाही? तेव्हा तपास केला असता शाळेच्या स्लॅब खाली मुलगी दबून पडलेली होती. यात तिचा मृत्यू झाला. कु. शितल पांडुरंग किरवले (वय ७वर्ष ) असे मृतक शाळाकरी मुलीचे नाव आहे. सदरील घटना खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून येत असून खंडाळा पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.