पुसद शहरातील हिराणी बंधु कापड दुकानातून महागड्या साडया चोरणा-या अनोळखी बुरखाधारी महीलानां नांदेड येथून ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई!

पुसद : बायकांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही. पण याच हौसेपोटी काही बायका कोणत्या थराला जाऊ शकतात. याचा प्रत्यय पुसद शहरात आला आहे. पुसद शहरातील हिराणी बंधू या कापड दुकानातून अनोळखी बुरख्याधारी महिलांनी महागड्या साड्या चोरल्या होत्या व त्या पसार झाल्या होत्या त्यावेळी कापड दुकानच्या मालकाने शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली त्यावेळी पोलीस पथकाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये अज्ञात भुरखादारी महिला महागड्या साड्या चोरतांनाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून आले त्यावेळी पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून गोपिनीय तपास करून मोठ्या शिताफीने या अज्ञात बुरखाधारी महिलांना नांदेड येथून ताब्यात घेतली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत.दि,१२ ऑक्टोंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहर पोलीस स्टेशन अप क्रमांक ५४५/२०२५ कलम३०३(२) भान्यास या गुंन्हाचा संमातर तपास करीत असतांना नमूद पथकाने हिराणी बंधू दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यामध्ये अज्ञात बुरखाधारी महीला दिसून आल्याने पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती काढली कि, दि,६ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून चोरी करणा-या बुरखाधारी महीला हया नांदेड परिसरातील असल्याबाबत माहीती संकलीत करुन सदर बुरखाधारी अज्ञात महीलेचा शोध घेण्याकामी वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जावून अज्ञात बुरखाधारी महीला हया १) फरजाना बेगम शेख नईम वय ४३ वर्ष २) फईम बेगम हकिम खान वय ५०वर्ष दोन्ही रा. श्रावस्ती नगर नांदेड असे असल्याचे निष्पन्न करुन त्यांना नांदेड येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून गुंन्हातील चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व ८ वेगवेगळ्या रंगाच्या महागड्या साडया किंमत ३५०००/- रुचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) अपर पोलीस बी. अशोक थोरात (म.पो. से) सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी नरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद भाडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश रडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मपोशि/जयाश्री श्रिरामजवार शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.